बॉलिवूडचा खिलाडी कुमार म्हणजेच अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय कुमार हा सोशल मीडियावर कायमच सक्रिय असतो. तो अनेकदा सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. अक्षय कुमार हा सध्या ‘बच्चन पांडे’ या त्याच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. नुकतंच अक्षय कुमारने कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ च्या शो मध्ये प्रमोशनसाठी नकार दिल्याची माहिती समोर येत आहे.

छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय शो म्हणून ‘कपिल शर्मा शो’ ला ओळखले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्माचे विनोद ऐकून सर्वांना हसू अनावर होते. या शोमध्ये अनेक कलाकार त्यांच्या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी हजेरी लावत असतात. मात्र अक्षय कुमारने त्याच्या आगामी चित्रपटासाठी कपिल शर्मा शो मध्ये येण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यामुळे अक्षय कुमार आणि कॉमेडियन कपिल शर्मा यांच्यात काहीतरी बिनसल्याचे बोललं जात आहे. मात्र आतापर्यंत कपिल शर्मा किंवा त्याच्या जवळच्या कोणत्याही सूत्राने या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही.

sonakshi sinha reaction on pregnancy rumours
सोनाक्षी सिन्हाने गरोदर असल्याच्या अफवांवर दिली प्रतिक्रिया; म्हणाली, “लोक वेडे…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Paaru
Video : अनुष्का आदित्यच्या घरातील व्यक्तीचा अपघात घडवून आणणार? पारूला सत्य समजणार का? पाहा प्रोमो
Muramba
Video: शिवानी मुंढेकरचा मॉर्डन लूक व ‘या’ अभिनेत्याची होणार एन्ट्री; पाहा ‘मुरांबा’ मालिकेचा नवीन प्रोमो
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra News : मंत्रिमंडळ विस्तारासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार तातडीने दिल्ली दौऱ्यावर
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
abhishek bachchan aishwarya rai
ऐश्वर्या राय-अभिषेक बच्चन दुसऱ्यांदा आई-बाबा होणार? रितेश देशमुखच्या ‘त्या’ प्रश्नावर अभिनेता म्हणाला…
Vasai-Virar City Municipal Corporation
प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांची समाजमाध्यमावर बदनामी

हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार, काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार त्याच्या एका चित्रपटाच्या प्रमोशनसाठी कपिल शर्मा शो मध्ये आला होता. त्यावेळी कपिल शर्माने अप्रत्यक्षपणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता अक्षयची खिल्ली उडवली होती. याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

‘लतादीदी शेवटच्या क्षणीही हसत होत्या’, रुग्णालयात उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी केला खुलासा

या संपूर्ण घटनेमुळे अक्षय कुमार हा कपिल शर्मा आणि त्याच्या संपूर्ण टीमवर नाराज असल्याचे बोललं जात आहे. तसेच या घडलेल्या प्रकाराचा अक्षय कुमारला प्रचंड राग आला आणि कपिल शर्माने त्याचा विश्वास तोडला आहे, असेही वृत्त समोर येत आहे. मात्र, या वृत्तावर कपिल शर्माकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

अक्षय कुमारचा बच्चन पांडे हा चित्रपट १८ मार्चला प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत झळकणार असून अभिनेत्री क्रिती सेनॉन त्याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. तसेच अर्शद वारसी, जॅकलीन फर्नांडिस, पंकज त्रिपाठी ही कलाकारमंडळीदेखील महत्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहेत. या चित्रपटाचं दिग्दर्शन फरहाद सामजी करत आहेत.

Story img Loader