अक्षय कुमारच्या मार्शल आर्टच्या कौशल्याबाबत सर्वच परिचित आहेत. चित्रपटांत गुडांशी चार हात करणारा नायक कितीही आकर्षक दिसत असला तरीही, दैनंदिन जीवनातही प्रत्येकाला मार्शल आर्ट्सचा संरक्षणासाठी उपयोग करून घेता येऊ शकतो. सर्वानीच मार्शल आर्ट्सचे धडे गिरवले पाहिजेत, असे मत अक्षयकुमारने नेहमीच ठामपणे व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर तो आदित्य ठाकरेसोबत प्रशिक्षण शाळाही सुरु करत आहे.
तथापि आता, अक्षयने अजून एक पाऊल पुढे टाकत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिक्षणाचा एक भाग म्हणून स्वसंरक्षणाचाही समावेश करण्यात यावा अशी विनंती केली आहे. शाळांमध्ये किमान चार वर्षे तरी प्रत्येक मुला-मुलीला स्वसंरणाचे शिक्षण शाळांतून देण्यात यावे अशीही त्यांनी विनंती केली. प्रत्येक नागरिकाने स्वतःसाठी लढणे गरजेचे आहे त्यासाठी मी गेली पाच वर्षे काम करत असल्याचे अक्षयने म्हटले आहे. तसेच, नरेंद्र मोदींनी यावर आपण नक्कीच विचार करू असे म्हटल्याचेही त्याने सांगितले.