बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा सिनेसृष्टीतील सर्वात व्यस्त अभिनेत्यांपैकी एक म्हणून ओळखला जातो. तो अनेकदा त्याच्या चित्रपटांच्या टीझर, ट्रेलरमुळे चर्चेत असतो. अक्षयचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करतात. अक्षय कुमार हा बॉलिवूडमधील एकमेव अभिनेता आहे जो वर्षाला किमान ५ ते ६ चित्रपट करतो. अक्षय कुमारची गणना बॉलिवूडमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या सुपरस्टार्समध्ये केली जाते. नुकतंच एका मुलाखतीत अक्षय कुमारने एका वर्षात तो इतके चित्रपट का करतो यामागचे गुपित सांगितले आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

अक्षय कुमार हा सध्या त्याच्या आगामी ‘बच्चन पांडे’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. येत्या १८ मार्चला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यावेळी एका कार्यक्रमादरम्यान अक्षयने चित्रपटाबद्दलची माहिती दिली. त्यावेळी त्याने विविध प्रश्नांवर उत्तर दिली. ‘तू एका वर्षात इतके चित्रपट कसे करतो?’ असा प्रश्न अक्षय कुमारला विचारण्यात आला होता.

त्यावर उत्तर देताना अक्षय म्हणाला, “मी दररोज सकाळी कामावर जातो आणि रविवारी सुट्टी घेतो. जर तुम्ही रोज काम करत असाल तर सहजपणे अनेक चित्रपट तुम्हाला करता येतात. करोना काळात प्रत्येकजण काम करत होता. पोलिसांपासून ते पापाराझींसह मीडियापर्यंत सर्वजण त्यांचे त्यांचं काम करत होते. प्रत्येकजण पैसे कमवण्यासाठी काम करतो. आज माझ्या आयुष्यात सर्वकाही आहे. मी आज फार चांगलं आयुष्य जगतोय.”

“मी आरामात न कमवताही घरबसल्या खाऊ शकतो. पण मग इतरांचे काय? त्यांना पैसे कमावायचे आहेत. मी आज पैशांसाठी काम करत नाही तर फक्त आवडीसाठी काम करतो. ज्या दिवशी माझी आवड कमी होईल, त्या दिवसापासून मी स्वत: काम करणं बंद करेन”, असेही अक्षयने सांगितले.

अक्षय कुमार हा ९० च्या दशकापासून एका वर्षात ३ ते ४ चित्रपटांमध्ये भूमिका साकारत असतो. हल्ली तर तो वर्षाला ५ ते ६ चित्रपट करतो. त्याचे दरवर्षी बॉक्स ऑफिसवर पाच ते सहा चित्रपट प्रदर्शित होतात. सध्या तो बच्चन पांडे या चित्रपटामुळे चर्चेत आहे. ‘बच्चन पांडे’ फरहाद सामजी यांनी दिग्दर्शित केला आहे. तर साजिद नाडियादवाला यांनी याची निर्मिती केली आहे. अक्षय व्यतिरिक्त या चित्रपटात अर्शद वारसी, क्रिती सेनन आणि जॅकलिन फर्नांडिस यांच्याही भूमिका आहेत.

त्यासोबतच तो सध्या ‘OMG 2’ आणि ‘राम सेतू’ या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. याशिवाय अक्षय ‘रक्षाबंधन’, ‘सिंड्रेला’, ‘डबल एक्स एल’, ‘ड्रायव्हिंग लायसन्स’, ‘राऊडी राठौड २’ मध्ये दिसणार आहे. तर या आधी त्याचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar reveals why he shoots for so many films a year says nrp