बॉलिवूडमध्ये सुपरहिट ठरलेल्या चित्रपटांचे सिक्वल येणं ही गोष्ट काही नवीन नाही. अवघ्या काही दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेता सलमान खानने त्याच्या बजरंगी भाईजान या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली होती. त्यानंतर आता बॉलिवूडचा खिलाडी म्हणजे अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित रावडी राठोडचा सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. विशेष म्हणजे राऊडी राठोड २ या चित्रपटाची तयारीही सुरु झाल्याचे बोललं जात आहे. विशेष म्हणजे प्रसिद्ध दिग्दर्शक एसएस राजामौली यांचे वडील लेखक के. व्ही विजयेंद्र प्रसाद हे या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर काम करत आहेत. त्यांनी स्वतः या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

राऊडी राठोड या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा चित्रपटाच्या सहनिर्मात्या शबिना खान यांनी फार पूर्वीच केली होती. मिळालेल्या माहितीनुसार, २०२० मध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार होते. पण करोनामुळे हा चित्रपट रखडला होता. मात्र आता हा चित्रपट प्री-प्रॉडक्शनच्या टप्प्यात असून त्याचे काम वेगाने सुरू आहे.

‘मिड डे’ या वृत्तापत्राने दिलेल्या वृत्तानुसार, के. व्ही विजयेंद्र या चित्रपटाच्या स्क्रिप्टवर सध्या काम करत आहेत. ते लवकरच चित्रपटाची स्क्रिप्ट पूर्ण करणार आहे. त्यामुळे लवकरच या चित्रपटाचे शुटींग सुरु केले जाईल, असे बोललं जात आहे. राऊडी राठोड २ मध्ये अक्षय कुमार आणि सोनाक्षी सिन्हा हे दोघे प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. पण दुसऱ्या भागाची कथा पहिल्या चित्रपटाच्या शेवटापासून सुरू होणार नाही. ती त्यापेक्षा वेगळी असेल, असेही ते म्हणाले.

अबब..! ‘83’ चित्रपटासाठी कपिल देव यांना मिळालेत ‘इतके’ पैसे; संपूर्ण संघाला तर…

दरम्यान या चित्रपटाचे शूटिंग 2022 मध्ये सुरू होण्याची शक्यता आहे. त्याआधी अक्षय कुमार आणि सोनाक्षी त्यांच्या आगामी अनेक चित्रपटांचे शूटिंग करताना दिसत आहे.

अक्षय कुमार व सोनाक्षी सिन्हा यांची प्रमुख भूमिका असलेला ‘रावडी राठोड’ हा अॅक्शन कॉमेडी चित्रपट २०१२ साली प्रदर्शित झाला होता. प्रभुदेवाने दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटाला तुफान प्रतिसाद मिळाला होता. ‘रावडी राठोड’ ‘विक्रमार्कुडु’ या चित्रपटाचा रिमेक होता. दमदार कथानकासोबतच या चित्रपटाची गाणी सुद्धा विशेष गाजली होती. आता या चित्रपटाच्या सिक्वेल म्हणजे अक्षय कुमारला बघणे त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्वणी असणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar rowdy rathore 2 script in the process confirms kv vijayendra prasad nrp