बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना त्यांचा मुलगा आरवचा आज वाढदिवस साजरा करत आहे. आरव आज १९ वर्षांचा झाला आहे. आरवच्या वाढदिवसानिमित्ताने ट्विंकलने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे. ही पोस्ट शेअर करत ट्विंकलने आरवला शुभेच्छा दिल्या आहेत. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे.

ट्विंकलने ही पोस्ट तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केली आहे. या पोस्टमध्ये ट्विंकलने आरवचा आणि तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ते दोघे झाडा खाली बसले आहेत. या फोटोत आरवने मल्टि कलरचा टी-शर्ट परिधान केला आहे. तर ट्विंकलने शर्ट आणि निळ्या रंगाचा कोट आणि जीन्स परिधान केला आहे. हा फोटो शेअर करत ‘माझा सुंदर बर्थडे बॉय’ असे कॅप्शन ट्विंकलने दिले आहे.

आणखी वाचा : नागा चैतन्य आणि साई पल्लवीच्या ‘लव्ह स्टोरी’ वर समांथा म्हणाली…

दरम्यान, सगळ्या स्टार किड्समध्ये आरव आहे ज्याला लाइमलाईटपासून लांब रहायला आवडते. एका शो मध्ये अक्षयने सांगितले होते की, आरवला लाइमलाईटपासून लांब रहायला आवडते. एवढंच नाही तर तो अक्षय कुमारचा मुलगा आहे हे देखील सांगायला त्याला आवडत नाही.

आणखी वाचा : ‘हे टी-शर्ट २०० रुपयांना लिंकिंग रोडला मिळेल’, कपड्यांमुळे करीना कपूर झाली ट्रोल

दरम्यान, अक्षयचा ‘बेल बॉटम’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. या व्यतिरिक्त रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सुर्यवंशी’ या चित्रपटात अक्षय दिसणार आहे. तर पुढे अक्षय ‘अतरंगी रे’, ‘रक्षा बंधन’ आणि ‘राम सेतु’ या चित्रपटांमध्ये ही दिसणार आहे.

Story img Loader