अभिनेता अक्षय कुमारचा बहुचर्चित ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट अखेरीस प्रदर्शित झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर, प्रमोशन करण्याची पद्धत पाहता ‘सम्राट पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर कमाल करणार असं बोललं जात होतं. पण प्रत्यक्षात मात्र असं काहीच घडलं नाही. अक्षयच्या या चित्रपटाने प्रेक्षकांचा देखील अपेक्षाभंग केला असं म्हणालयला हरकत नाही. अक्षयच्या इतर चित्रपटांच्या तुलनेमध्ये या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी फार कमी कमाई केली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपट ४९५० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला. पहिल्याच दिवशी हा चित्रपट २० कोटी रुपयांपेक्षा अधिक कमाई करणार असं बोललं जात होतं. पण या चित्रपटाने प्रदर्शनाच्या पहिल्या दिवशी फक्त १०.५० ते ११.५० कोटी रुपये इतपतच कमाई केली. प्रेक्षकांना या चित्रपटाकडून बऱ्याच अपेक्षा होत्या. मात्र चित्रपटासाठी मिळणारा प्रतिसाद हा फार कमी आहे.

आणखी वाचा – ज्ञानवापीमधील लीक व्हिडीओसंदर्भात अक्षय कुमारने स्पष्टपणे मांडलं मत; “ते शिवलिंग आहे असं…”

अक्षयचे याआधी प्रदर्शित झालेले ‘बच्चन पांडे’, ‘बेल बॉटम’ हे दोन्ही चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगलेच आपटले. या चित्रपटांनी केलेली कामगिरी फारच निराशाजनक होती. म्हणूनच ‘सम्राट पृथ्वीराज’मधून काहीतरी नवं आपल्याला पाहायला मिळणार याबाबत चाहत्यांमध्ये उत्सुकता होती. मात्र काहीसं वेगळं चित्र यावेळीही पाहायला मिळालं.

आणखी वाचा – VIDEO : विमानतळावर रणबीर कपूरवर फुलांचा वर्षाव, चाहत्यांची गर्दी अन्…, अभिनेत्याच्या एका गोष्टीने जिंकलं साऱ्यांचं मन

या चित्रपटात अक्षयने पृथ्वीराज चौहान यांची भूमिका साकारली आहे. तर मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर, सोनू सूद आणि संजय दत्त देखील या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. मानुषीचा हा पहिलाच हिंदी चित्रपट आहे. या चित्रपटाद्वारे सम्राट पृथ्वीराज चौहान यांची जीवनगाथा मोठ्या पडद्यावर साकारण्यात आली आहे. आत विकेण्डच्यानिमित्ताने देखील प्रेक्षक चित्रपटगृहामध्ये गर्दी करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar samrat prithivraj movie opening day box office collection film earned less than 12 crore kmd