बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. नुकताच अक्षयचा ‘बच्चन पांडे’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. पण ‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटामुळे त्याचा हा चित्रपट फ्लॉप गेला असा टोमणा त्याने मारला आहे. अक्षयने भोपाळ येथे आयोजित ‘चित्र भारती फिल्म फेस्टिव्हल’मध्ये हजेरी लावली होती. यावेळी अक्षयसोबत ‘द काश्मीर फाइल्स’ चित्रपटाचे दिग्दर्शक विवेक अग्निहोत्रीही मंचावर उपस्थित होते.

हा फिल्स फेस्टिव्हल माखनलाल चतुर्वेदी नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ जर्नलिझम अँड कम्युनिकेशनने आयोजित केला होता. या कार्यक्रमात बोलताना अक्षय म्हणाला, “आम्हाला सगळ्यांना आपल्या देशाच्या काही माहित असलेल्या गोष्टी किंवा न माहित असलेल्या गोष्टी सांगायच्या आहेत. विवेकजींनी द काश्मीर फाइल्स बनवून आपल्या देशाचे एक अत्यंत वेदनादायक सत्य सगळ्यांसमोर मांडले आहे. हा चित्रपट पाहिल्यानंतर आपण सगळे हादरून गेलो आहोत. एवढंच काय माझा चित्रपट पण बुडवला.” अक्षयचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

mla sanjay rathod upset over baseless news spread against him by media
“मन दुखावले, जिव्हारी लागले…” आमदार संजय राठोड असे का म्हणाले?
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
najma heptulla on indira gandhi emergency
Indira Gandhi: “इंदिरा गांधींना आणीबाणीचा पश्चात्ताप होत होता”, नजमा हेपतुल्ला यांचा आत्मचरित्रात दावा; विश्वासू व्यक्तींबाबतही होती तक्रार!
Sonu Nigam
सोनू निगम कार्यक्रम सोडून गेलेल्या नेत्यांवर नाराज; म्हणाला, “हा सरस्वतीचा अपमान…”
kareena kapoor lal singh chadhha aamir khan
‘लाल सिंग चड्ढा’च्या अपयशाने निराश झाला होता आमिर खान, करीना कपूर खानने केला खुलासा; म्हणाली…
Lalu Prasad Yadav Controversial comment
Lalu Prasad Yadav Video : “नयन सेंकने….”; नितीश कुमार यांच्या महिला संवाद यात्रेबद्दल लालू प्रसाद यादव यांचं आक्षेपार्ह वक्तव्य
Shivsena UBT News
Shiv Sena UBT : “ठाकरेंच्या शिवसेनेला नाकारण्याचा जनतेचा निर्णय किती योग्य, हेच पुन्हा अधोरेखित होतंय”, भाजपा नेत्याची आगपाखड
jayant patil devendra fadnavis maharashtra assembly session
Video: “सासऱ्यांचाच आग्रह होता की…”, जयंत पाटलांच्या ‘त्या’ मुद्द्यावर देवेंद्र फडणवीसांची मिश्किल टिप्पणी!

आणखी वाचा : “The Kashmir Files चित्रपट युट्यूबवर प्रदर्शित करा”, म्हणणाऱ्या अरविंद केजरीवाल यांना अनुपम खेर यांचे सडेतोड उत्तर; म्हणाले…

आणखी वाचा : या चित्रात तुम्हाला सगळ्यात आधी काय दिसले? यावरून कळेल तुमचे व्यक्तीमत्त्व

‘द काश्मीर फाइल्स’ या चित्रपटाने २०० कोटींच्या वर बॉक्स ऑफिसवर गल्ला केला आहे. हा चित्रपट काश्मिरी पंडितांच्या स्थलांतरित जीवनावर आधारित आहे. काश्मीर फाईल्स हा चित्रपट १९८९ आणि १९९० मध्ये काश्मिरी पंडितांच्या झालेल्या स्थलांतरावर आधारित आहे. हा चित्रपट अनेक राज्यांमध्ये करमुक्त करण्यात आला आहे.

Story img Loader