अभिनेता अक्षय कुमारच आज कोट्यावधी रुपयांचा मालक आहे. मुबंईमध्ये तो अलिशान घरामध्ये राहतो. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्याने स्वतःचं साम्राज्य उभं केलं आहे. अक्षयने काही वर्षांपूर्वी अंधेरीमध्ये एक घर खरेदी केलं होतं. गुंतवणूक म्हणून त्याने हे घर खरेदी केलं. पण आता हे घर त्याने विकलं आहे. एका प्रसिद्ध संगीतकाराला त्याने हे घर विकलं असल्याची माहिती समोर येत आहे.
आणखी वाचा – Video : मराठमोळ्या व्यक्तीच्या घरी जावून करिश्मा-करीनाने झुणका भाकरीवर मारला ताव, व्हिडीओ व्हायरल
अंधेरी परिसरामध्ये ४ कोटी १२ लाख रुपयांमध्ये अक्षयने घर खरेदी केलं. आता त्याचं हे घर संगीतकार डब्बू मलिक यांनी खरेदी केलं आहे. डब्बू मलिक हे अरमान मलिक व अमाल मलिकचे वडील आहेत. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, अंधेऱी पश्चिम भागामधील ट्रांसकॉन ट्रायम्फ टॉवरमध्ये अक्षयचं घर होतं.
१२८१ स्क्वेअर फिट असलेल्या घराला आकर्षक बाल्कनी आहे. ५९ फिटची ही बाल्कनी आहे. ऑगस्टमध्येच अक्षय व डब्बू यांच्यामध्ये घर खरेदी करण्याबाबत चर्चा झाली होती. डब्बू व त्यांची पत्नी ज्योति मलिक यांनी ६ कोटी रुपयांना अक्षयचं हे घर खरेदी केलं आहे.
आणखी वाचा – Video : ऐश्वर्या राय बच्चन दुसऱ्यांदा गरोदर? व्हायरल व्हिडीओमुळे चर्चांना उधाण
इतकंच नव्हे तर अंधेरी पूर्व व पश्चिम परिसरामध्ये अक्षयने बरीच प्रॉपर्टी खरेदी केली आहे. बोरीवली, मुलुंड, जुहू परिसरामध्ये अक्षयने गुंतवणूक केली आहे. परदेशातही त्याने अलिशान घर खरेदी केलं असल्याची चर्चा आहे.