बॉलिवूडमध्ये खिलाडी म्हणून प्रसिद्ध असलेला अभिनेता अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित चित्रपट ‘ब्रदर्स’चा फर्स्ट लूक प्रदर्शित झाला असून, अक्षयने त्याच्या टि्वटर खात्यावरून हा फर्स्ट लूक प्रदर्शित केला आहे. चित्रपटात अक्षय कुमारबरोबर सिध्दार्थ मल्होत्रादेखील काम करत आहे. ब्रदर्सच्या पहिल्या पोस्टरने चित्रपट रसिकांमध्ये या चित्रपटाविषयी कमालीची उत्सुकता निर्माण केली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चित्रपटात सिध्दार्थ मल्होत्रा अक्षय कुमारच्या भावाची भूमिका साकारत असून, अभिनेता जॅकी श्रॉफ त्यांच्या वडिलांच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘ब्रदर्स’ हा चित्रपट हॉलिवूडमधील ‘वॉरिअर’ चित्रपटाचा अधिकृत रिमेक आहे. १४ ऑगस्ट रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस चित्रपटातील प्रमुख स्त्री पात्र साकारताना दिसेल.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा