अक्षय कुमार आपल्या कामात कितीही व्यग्र असला तरी कुटुंबाला आणि आपल्या मुलांना वेळ द्यायला तो कधीच विसरत नाही. मुलगा आरव असो किंवा मुलगी नितारा खिलाडी कुमार आपल्या व्यग्र कामकाजातून त्यांना वेळ द्यायला नेहमीच प्राधान्य देतो. ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी परदेशी गेलेला अक्षय नुकताच परतलाय आणि परतल्यानंतर तो सर्वप्रथम आपली मुलगी नितारासोबत वेळ घालवताना दिसतोय.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

अक्षयने आपल्या मुलीसोबतचा एक व्हिडिओ ट्विटर अकाऊंटवर शेअर केलाय. या व्हिडिओमध्ये नितारा झोका घेताना दिसतेय. झोका घेत असतानाच तिचे पाय अक्षय कुमारच्या छातीला लागतात आणि तिला हसवण्यासाठी खिलाडी कुमार दुखल्याचे नाट्य करताना दिसतोय. दोघांचा हा व्हिडिओ पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू उमटेल.

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी लंडनला रवाना होण्याआधी अक्षय कुमारने कुटुंबियांसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतला. ट्विंकल खन्नाने इन्स्टाग्रामवर सुट्ट्यांचा आनंद घेतानाचे अनेक फोटो शेअर केले आहेत. तर अक्षयनेही मुलगा आरव आणि मुलगी नितारासोबतचे दोन फोटो शेअर केले.

वाचा : आत्मचरित्रातून उलगडणार नवाजुद्दीनचा जीवनप्रवास

अक्षयचा ‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ हा चित्रपट ११ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. स्वच्छ भारत अभियान, स्वच्छतेची गरज आणि खेडेगावांमध्ये शौचालयांअभावी उद्भवणाऱ्या समस्या अशा विषयांवर हा चित्रपट भाष्य करणार आहे. या चित्रपटानंतर तो ‘गोल्ड’ आणि रजनीकांतच्या ‘२.०’ चित्रपटातही भूमिका साकारणार आहे.