‘रामलीला’च्या यशानंतर दिग्दर्शक संजय लीला भन्साली नवीन चित्रपटासाठी सज्ज झाला आहे. त्याच्या आगामी ‘गब्बर’ या चित्रपटात अक्षय कुमार प्रमुख भूमिकेत दिसणार आहे. नुकतेच अक्षयने चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात केल्याचे इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साइटवर पोस्ट केले आहे.
अक्षयने फोटोसह पोस्ट केले आहे की, नवीन चित्रपट, नवीन लूक आणि देवाच्या आशीर्वादाने नवीन वर्षाची सुरुवात झाली आहे. ‘गब्बर’ चित्रपटाचा पहिला शॉट देत आहे. तुमच्या शुभेच्चा असू द्या. अभिनेत्री करिष्मा कपूरही त्याला शुभेच्छा देण्यासाठी ‘गब्बर’च्या सेटवर गेली होती. त्यावर, त्याने माझी सर्वात पहिली हिरोईन मला शुभेच्छा देण्यासाठी सेटवर आली आहे, असे फोटोसहित इन्स्टाग्रामवर पोस्ट केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा


२०१३ वर्षाकडे पाहता अक्षयला खरचं त्याच्या चाहत्यांच्या शुभेच्छांची गरज आहे. गेल्यावर्षी त्याचे तीन चित्रपट प्रदर्शित झाले. मात्र, ते काही खास कमाल दाखवू शकले नाही. त्यातल्या त्यात अक्षयचा ‘स्पेशल २६’ ब-यापैकी चालला.
‘गब्बर’ हा अॅक्शनपट असून, याचे दिग्दर्शन क्रीशचे आहे तर निर्मिती संजय लीला भन्सालीची आहे. श्रुती हसनचीही प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट यावर्षी २५ डिसेंबरला जगभरात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे. २००२ साली प्रदर्शित झालेल्या ‘रामाना’ या तमिल चित्रपटाचा ‘गब्बर’ रिमेक आहे.