अभिनेता अक्षय कुमारला चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान झालेल्या अपघातात दुखापत झाली. त्यामुळे अक्षयला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अक्षय कुमारच्या निकटवर्तीयाकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षयला अंधेरी येथील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.  प्राथमिक उपचारानंतर अक्षयला घरी सोडण्यात आले आहे. अक्षयला कोणत्याप्रकारची दुखापत झालीय ते अद्याप समजू शकलेले नाही. या चित्रपटाचे शिर्षक अद्याप ठरविण्यात आलेले नाही तरी, सदर चित्रपटाचे विपुल शहा दिग्दर्शन करत आहेत.  

Story img Loader