बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा ‘बेल बॉटम’ सिनेमा लवकरच प्रदर्शित होणार आहे. कोव्हिड आणि लॉकडाउननंतर अक्षयचा रिलीज होणारा हा पहिला बिग बजेट सिनेमा आहे. या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासूनच प्रेक्षकांची उत्सुकता ताणली गेलीय. यातच आता सिनेमाच्या रिलीजपूर्वी अक्षय कुमारने एका खास व्यक्तीचे आशिर्वाद घेतले आहेत. ही खास व्यक्ती दुसरी तिसरी कुणी नसून कॉमेडी किंग कपिल शर्मा आहे.

खिलाडी कुमारने नुकतीच कपिल शर्माच्या ‘द कपिल शर्मा शो’ च्या नव्या सिझनच्या ग्रॅण्ड प्रिमिअरला हजेरी लावली होती. या आधी देखील अक्षय कुमारने आपल्या अनेक सिनेमांच्या प्रमोशनसाठी कपिल शर्माच्या शोमध्ये हजेरी लावली आहे. यावेळी देखील अक्षयने कपिल शर्माच्या या नव्या सिझनच्या पहिल्याच एपिसोडमध्ये खास हजेरी लावत सिनेमाचं प्रमोशन देखील केलंय. लवकरच हा एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला येईल.

कपिल शर्माने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केलाय. या मजेशीर फोटोत अक्षय कुमार वाकून कपिल शर्माचे पाय धरत असल्याचं दिसतंय. खरं तर हा फोटो कपिल शर्माच्या एका जुन्या एपिसोडचा आहे. हा फोटो शेअर करत कपिल कॅप्शनमध्ये म्हणाला, “सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार आपला आगामी सिनेमा बेलबॉटमसाठी आशिर्वाद घेताना”

 

View this post on Instagram

 

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma)

कपिलने शेअर केलेल्या या फोटोला सोशल मीडियावर मोठी पसंती दिली जातेय. या फोटोवर अनेक नेटकऱ्यांनी धमाल कमेंटदेखील केल्या आहेत. एक नेटकरी म्हणाला, “आता अक्षय सर पहाटे साडे चार वाजता शूटिंग ठेवणार”. काही दिवसांपूर्वीच कपिल शर्माच्या नव्या शोचा टीजर प्रदर्शित झालाय. यात शोमधील संपूर्ण टीम दिसतेय.

Story img Loader