काही दिवसांपूर्वी अभिनेता अक्षय कुमारचा ‘रक्षाबंधन’ चित्रपट प्रदर्शित झाला होता. पण चित्रपटाला हवं तितकं यश मिळालं नाही आणि चित्रपट फ्लॉप ठरला. ‘रक्षाबंधन’ हा अक्षयचा सलग दुसरा फ्लॉप चित्रपट आहे. त्यापूर्वी त्याचा बिग बजेट ‘सम्राट पृथ्वीराज’ हा चित्रपट प्रेक्षकांना आकर्षित करण्यास अपयशी ठरला. बॉलिवूड चित्रपट फ्लॉप होण्यामागे बॉयकॉट ट्रेंड्स असल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, अक्षय कुमारचा आणखी एक चित्रपट ‘कठपुतली’चा ट्रेलर नुकताच लाँच झाला आहे. यादरम्यान मीडियाशी संवाद साधताना चित्रपट फ्लॉप झाल्यावर त्याची जबाबदारी कोणाची, याबद्दल अक्षयने भाष्य केलंय.

हेही वाचा – सुपरफ्लॉप ठरलेल्या ‘शमशेरा’मागील ग्रहण संपेना; कोर्टाने निर्मात्यांना एक कोटी जमा करण्याचे दिले आदेश

चित्रपट चालला नाही तर त्याची जबाबदारी मी घ्यायला हवी आणि मी ती घेतोय, असं अक्षय कुमार माध्यमांशी संवाद साधताना म्हणाला. “मी करत असलेल्या काही गोष्टी बदलेन आणि मी कोणत्या प्रकारचे चित्रपट करायला हवे, यावरही लक्ष केंद्रित करेन. मी कोणत्या प्रकारच्या स्क्रिप्ट्स निवडल्या पाहिजेत? जेणेकरून माझ्या प्रेक्षकांना त्या आवडतील आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी करू शकेल. कारण मला असं वाटतं की मी जर एखादा चित्रपट करत असेन, ज्यामध्ये मी मुख्य भूमिका साकारत असेन तर त्याची संपूर्ण जबाबदारी माझ्यावर येते,” असं अक्षय म्हणाला.

हेही वाचा – “मी आईच्या मैत्रिणीसोबत सेक्स केल्याचं समजताच…”; ‘लॉक अप’ फेम शिवम शर्माने सांगितली कुटुंबियांची प्रतिक्रिया

चित्रपटगृहांपेक्षा OTT प्लॅटफॉर्मवर चित्रपट किती परफॉर्म करतात? या प्रश्नाला उत्तर देताना अक्षय कुमार म्हणाला की, “दोन्ही ठिकाणचे प्रेक्षक पूर्णपणे वेगळे आहेत. दोन्ही ठिकाणी लोकांना चित्रपट आवडला की नाही हे सांगण्याचा अधिकार आहे. जेव्हा चित्रपट OTT वर प्रदर्शित होतो, तेव्हा लोक तो पाहतात, मीडिया पाहते, समीक्षक पाहतात आणि चित्रपट आवडला की नाही, याबद्दल त्यांच्या प्रतिक्रिया देतात. माझ्यासाठी थिएटर आणि ओटीटी प्लॅटफॉर्म दोन्ही ठिकाणी चित्रपटाचा रिव्ह्यू महत्त्वाचा आहे. कारण तुम्हाला चित्रपटात कठोर मेहनत घ्यायची असते, याच एकमेव मार्गाने तुम्ही सक्रिय राहू शकता. लोकांची चित्रपटांबद्दलची आवडही याच माध्यमातून तुम्हाला कळते.”

हेही वाचा – KBC मध्ये एक कोटी रुपयांसाठी स्पर्धकाला विचारण्यात आला ‘हा’ प्रश्न; तुम्हाला उत्तर माहितीये का?

‘जॉली एलएलबी ३’, ‘राम सेतू’, ‘कॅप्सूल गिल’, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’, ‘गोरखा’, सूरराई पोत्तरूचा हिंदी रिमेक, ‘ओह माय गॉड २’ आणि ‘ सेल्फी हे अक्षय कुमारचे आगामी चित्रपट आहेत.

Story img Loader