सध्या बॉलीवूडमध्ये अभिनेता अक्षय कुमार त्याच्या आगामी ‘रूस्तम’ या चित्रपटाच्यानिमित्ताने चांगलाच चर्चेत आहे. आता अभिनेता रणवीर सिंग याने ट्विट केलेल्या एका छायाचित्रामुळे या चर्चेत आणखीनच भर पडली आहे. हे छायाचित्र रणवीर सिंगच्या बालपणीचे असून तो या छायाचित्रात ‘खिलाडी’फेम अक्षय कुमारसोबत दिसत आहे. या छायाचित्रातील लहान मुलगा रणवीर सिंग असल्याचे समजल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. हे छायाचित्र सध्या सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. मी लहानपणी अक्षय कुमारचा मोठा चाहता असल्याचे रणवीर सिंगने ट्विटमधील संदेशात म्हटले आहे.
सलमान म्हणतो ‘रुस्तम’ बघाच
रणवीर सिंग नेहमीच त्याच्या हटके कृत्यांमुळे बॉलीवडूमध्ये आकर्षणाचा विषय ठरला आहे. रणवीर सिंगने काही दिवसांपूर्वी पॅरिसमध्ये ‘सुलतान’ चित्रपट पाहिला होता. यावेळी सुलतानच्या ‘बेबी को बेस पसंद है’ आणि ‘लगे ४४०’ वोल्ट गाण्यांवर थिरकण्याचा मोह रणवीरला आवरता आला नाही. त्याने चित्रपटाचे स्क्रिनिंग सुरू असतानाच गाण्यांवर बेधुंद होऊन नाचण्यास सुरूवात केली. उपस्थितांनाही रणवीरच्या नृत्याला जोरदार प्रतिसाद दिला.
मला त्याला ठार मारावेसे वाटते; रणवीरच्या ‘त्या’ डान्सवर सलमानची प्रतिक्रिया
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा