बॉलीवूडचा अॅक्शन हिरो म्हणून अक्षय कुमारची प्रसिद्धी आहे. आता हा अॅक्शन हिरो स्वतःचे मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असल्याची चर्चा आहे.
अक्षयने भारतात एटवोन्डो ब्लॅक बेल्ट प्रशिक्षण घेतले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने मार्शल आर्ट स्पर्धेत पुढाकार घेतला होता. आणि आता तो युवा नेता आदित्य ठाकरेसोबत मार्शल आर्ट प्रशिक्षण केंद्र सुरु करणार असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलांसाठी सुरु करण्यात येणारी ही प्रशिक्षण शाळा मुंबईत सुरु होणार असून पुढे जाऊन त्याच्या महाराष्ट्रातही शाखा उघडण्याची शक्यता आहे. या प्रशिक्षण शाळेचे काम मे महिन्यापर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.

Story img Loader