आपल्या मार्शल आर्टच्या प्रेमासाठी प्रसिद्ध असलेला अक्षय कुमार मार्शल आर्टवर आधारित चित्रपट बनवू इच्छित आहे. चित्रपटात येण्यापूर्वी अक्षय कुमारने बँकॉकमध्ये मार्शल आर्टचे शिक्षण घेतले होते. ब्रिटन येथून फोनवर बोलताना अक्षय म्हणाला की, मार्शल आर्ट माझ्यासाठी हृदयाच्या खूप जवळ असून, मला यावर एक चित्रपट बनवायचा आहे. सध्या चित्रपटाच्या पटकथेचे काम सुरू असल्याचे देखील त्याने सांगितले.
तो पुढे म्हणाला, खेळाविषयीचे माझे प्रेम कधीही कमी होऊ शकत नही. मार्शल आर्टवर माझे मनापासून प्रेम असून, या खेळासाठी जे काही करता येण्यासारखे आहे, ते मी करू इछितो. चित्रपट अभिनेता असण्याच्या आधी मी एक मार्शल आर्ट फायटर आहे. अक्षयच्या ‘हरी ओम प्रॉडक्शन’द्वारे निर्माण होणाऱ्या या चित्रपटात तो स्वत: काम करण्याची शक्यता फार कमी आहे. चित्रपटात त्याच्यासाठीची एखादी भूमिका असेल किंवा नसेल याची माहिती नसल्याचे अक्षयने सांगितले. मिलन लुथ्रांच्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई अगेन’ या आगामी चित्रपटात अक्षय कुमार दिसणार आहे. हा चित्रपट २०१० साली आलेल्या ‘वन्स अपॉन अ टाईम इन मुंबई’ चा पुढील भाग आहे.

Story img Loader