दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच अक्षयकुमार दिसणार आहे. ‘आय हेट लव्ह स्टोरी’चा दिग्दर्शक पुनित मलहोत्रा हाच या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
या नव्या चित्रपटाचे शुटिंग पुढील वर्षाच्या सुरुवातीला सुरू होईल. चित्रपटामध्ये दोन मुख्य नायक असतील. त्यापैकी एकाची भूमिका अक्षयकुमार करेल. दुसऱया नायकाचे नाव पुढील आठवड्यात सांगण्यात येईल.
या चित्रपटाबद्दल आत्ता मी फार काही सांगणार नाही. पण हा मुख्य प्रवाहातील सिनेमा असेल आणि त्यातून एक सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. पुनीत यानेच या चित्रपटाचे कथानक माझ्याकडे दिले. ते वाचल्यावर मी लगेचच अक्षयकुमारला त्याबद्दल माहिती दिली आणि तोही या चित्रपटात काम करायला तयार झाला, असे करण जोहर याने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हंटले आहे.
मी आणि करण आम्ही दोघेही प्रेक्षकांचे मनोरंजन करणाऱया चित्रपटांची निर्मिती करण्याबाबत खूपच उत्साही आहोत. आमच्या वडिलांना आमच्याबद्दल अभिमान वाटावा, असेच काम आम्हाला दोघांनाही करत राहायचे आहे, अशी भावना अक्षयकुमारने व्यक्त केली.
करण जोहरच्या सिनेमात अक्षयकुमारची एन्ट्री!
दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहर याच्या आगामी चित्रपटात पहिल्यांदाच अक्षयकुमार दिसणार आहे. 'आय हेट लव्ह स्टोरी'चा दिग्दर्शक पुनित मलहोत्रा हाच या आगामी चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे.
First published on: 01-02-2013 at 12:08 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar to star in karan johars film