बॉलिवूडचा खिलाडी कुमार अक्षय कुमार हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अक्षय हा बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चित्रपट करणारा अभिनेता आहे. अक्षय फक्त अभिनय नाही तर त्याच्या फिटनेसमुळेही ओळखला जातो. नुकताच त्याचा अतरंगी रे चित्रपट प्रदर्शित झाला आहे. त्याचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. अक्षयने अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण तुम्हाला माहितीये अक्षयने एका अभिनेत्रीसोबत काम करण्यास नकार दिला आहे.
एकदा अक्षयने कॉमेडियन कपिल शर्मा शोमध्ये हजेरी लावली होती. त्यावेळी अक्षयने बॉलिवूडची बेबो अभिनेत्री करीना कपूरसोबत हजेरी लावली होती. यावेळी त्याने करीनासोबत काम करणार नाही असं म्हटलं होतं. पण अक्षय असं का म्हणाला हे जाणून घेऊ या.
आणखी वाचा : राम चरणसोबतच्या KISS वर समांथाचं मोठं वक्तव्य, सांगितलं लिपलॉकचं सत्य
अक्षय आणि करीनाने कपिलच्या शोमध्ये ‘गुड न्यूज’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पोहोचला होता. या दरम्यान, करीनाने कियारा अडवाणी आणि कपिल शर्माला आपल्या आजुबाजूला बसवले. ज्यानंतर अक्षय मस्करीत म्हणाला, ‘तुझा आणि माझा हा शेवटचा चित्रपट आहे. तू कपिल शर्मासोबतच चित्रपटात काम कर.’ यावर करीना कपिलशी हात मिळवत बोलते, ‘डील डन करूया.’
आणखी वाचा : लेकीचे केस पांढरे का? दिलीप जोशी म्हणाले…
सध्या अक्षय मालदीव्हसला त्याच्या कुटुंबासोबत नवीन वर्षाचे स्वागत करत आहे. तिथले त्याने त्याचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. त्यापैकी एक व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत अक्षय नवीन वर्षाच्या पहिल्या सुर्याचा नमस्कार करत गायत्री मंत्र बोलत नवीन वर्षाची सुरुवात केली आहे. नुकताच अक्षयचा ‘सूर्यवंशी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या व्यतिरिक्त तो ‘बच्चन पांडे’, ‘रक्षाबंधन’, ‘राम सेतू’ आणि ‘पृथ्वीराज’ या चित्रपटांमध्ये दिसत आहे.