बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार त्याची अभिनेता ही भूमिका जितक्या चोखपणे निभावत आहे त्याचप्रमाणे तो एक वडिल म्हणूनही परिपूर्ण ठरत आहे. अक्षय सध्या त्याच्या मुलांसोबत जास्त वेळ वेळ घालवतोय. काही दिवसांपूर्वी अक्षय त्याच्या कुटुंबासह मालदीव येथे गेला होता. मालदीवला सहकुटुंब गेलेल्या अक्षयने आणि ट्विंकलने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरुन काही फोटोही शेअर केले आहेत. सध्या ‘डॅडी’ अक्षय पुन्हा सोशल मीडियाववर चर्चेत आहे तो म्हणजे त्याच्या एका ट्विटर पोस्टसाठी. या पोस्टमध्ये अक्षयने त्याच्यी मुलीसोबतचा फोटो शोअर केला आहे. निताराच्या वाढदिवशी तिने ‘डॅडी’ अक्षयला एका मगरीचे रुप धारण करायला भाग पाडले असे अक्षयने त्याच्या ट्विटमध्ये लिहिले आहे.
अक्षयच्या या पोस्टमुळे त्याची खिलाडूवृत्ती त्याच्या मुलांनाही उमगली आहे असेच म्हणावे लागेल. निताराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ट्विंकलनेही तिचा आणि खिलाडी कुमारचा एका लहानशा स्विमिंग पूलमध्ये पोहतानाचा एक फोटो पोस्ट केला आहे. त्यामुळे चित्रपटांमध्ये व्यस्त असणारा अक्षय सध्यातरी त्याच्या मुलांसोबत जास्त वेळ घालवत आहे. गेल्या काही काळात ‘एअरलिफ्ट’, ‘हाऊसफुल्ल ३’, ‘रुस्तम’ यांसारखे हिट चित्रपट देत खिलाडी कुमारने या चढाओढीच्या काळातही चित्रपटसृष्टीतील त्याचे स्थान अबाधित ठेवले आहे असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा