बॉलिवूडमधील टॉप कलाकारांच्या यादीमध्ये अभिनेता अक्षय कुमारचं नाव आवर्जून घेतलं जातं. बिग बजेट चित्रपट करणं ही त्याची खासियत आहे. पण त्याचबरोबरीने अक्षय जाहिराती देखील तितक्याच करतो. मध्यंतरी अक्षय एका जाहिरातीमुळे अडचणीत सापडला होता. अजय देवगण आणि शाहरुख खानसोबत विमल पान मसाल्याच्या नवीन जाहिरातीत खिलाडी कुमार दिसला. त्यावरून अक्षयला ट्रोल करण्यात आलं. आता पुन्हा एकदा याच मुद्द्यावरून तो सोशल मीडियावर ट्रोल होत आहे.
सोशल मीडियावर अक्षयचा विचित्र लूकमधील एक फोटो वेगाने व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये अक्षय फाटलेला कुर्ता, मळकटलेले कपडे, विसकटलेले केस, हातात चहाचा कप घेऊन बसला आहे. त्याचा हा फोटो पाहून नेटकऱ्यांनी अक्षयला ट्रोल करण्यास सुरुवात केली. गुटख्याची जाहिरात करशील तर तुला लोकांची पसंतीच मिळणार नाही, तू बहुतेक जुबां केसरी हा शब्द अधिक वेळा बोलला आहेस. अशा विविध कमेंट्स करण्यास ट्रोलर्सने सुरुवात केली आहे.
आणखी वाचा – VIDEO : मध्यरात्री भररस्त्यातच उभं राहून जेवत होता कार्तिक आर्यन, व्हिडीओ पाहून लोक म्हणाले…
पण हा नवा लूक अक्षयच्या आगामी चित्रपटामधील आहे. तो सध्या एका चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे. याच चित्रपटाच्या सेटवरील त्याचा हा नवा लूक सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शाहरुखनंतर अक्षय देखील गुटख्याची जाहिरात करत असल्याने त्याला ट्रोलिंगचा सामना हा करावाच लागतो.

आणखी वाचा – VIDEO : …अन् पार्टीमध्ये बेधूंद होऊन नाचत राहिला शाहरुख खान, अभिनेत्याचा ‘तो’ व्हायरल व्हिडीओ चर्चेत
धूम्रपान करु नका म्हणून सांगणारा अक्षय आता त्याच पद्धतीची जहिरात करणं त्याच्या चाहत्यांच्या पसंतीस पडलं नाही. अक्षयने ही जाहिरात केल्यानंतर माफी देखील मागितली होती. पण त्याचा निर्णय चाहत्यांना पटलाच नाही. सध्या अक्षय त्याच्या आगामी ‘पृथ्वीराज’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. पण ‘पृथ्वीराज’ बॉक्स ऑफिसवर कधी दाखल होणार याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहे.