रजनीकांत यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘२.०’ या चित्रपटात अभिनेता अक्षय कुमार साकारत असलेल्या खलनायकी व्यक्तिरेखेचा लूक प्रदर्शित झाला आहे. अक्षय कुमार पहिल्यांदाच पहिल्यांदाच पडद्यावर खलनायकाची व्यक्तिरेखा साकारत असून ‘२.०’ मधील त्याचा ‘क्रो लूक’ अनेकांचे लक्ष वेधून घेत आहे. अक्षयचा हा मेकओव्हर त्याच्या चाहत्यांसाठी एकप्रकारचा धक्काच आहे. यामध्ये अक्षय कुमार डोळ्यांच्या लांब भुवया, पांढरे केस आणि काळ्या रंगाच्या जॅकेटमध्ये दिसत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अक्षय या चित्रपटात कावळ्यामध्ये रूपांतरित झालेल्या डॉ. रिचर्डची भूमिका साकारत आहे. गेल्या काही दिवसांपासून अक्षयच्या या लूकबद्दल पूर्णपणे गुप्तता बाळगण्यात आली होती. मात्र, आता अक्षयनेच ट्विटरवरून हा लूक शेअर केला आहे. ‘२.०’ हा रजनीकांत यांच्या ‘एथिरन’ या चित्रपटाचा सिक्वेल आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumar villainous crow look from rajinikanth revealed see pics