आपल्या अॅक्शन हिरोच्या प्रतिमेसाठी ओळखला जाणारा बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने थायलंडमध्ये जाऊन मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेतले आहे. भारतातील शालेय विद्यार्थ्यांनासुद्धा मार्शल आर्टचे प्रशिक्षण सक्तीचे करावे अशी मागणी अक्षय कुमारने शासनाकडे केली आहे. स्वसंरक्षणासाठी मार्शल आर्ट अत्यंत उपयुक्त असल्याने अक्षयने शासनाकडे ही विनंती केली आहे. येणाऱ्या काळात शाळांमध्ये किमान तीन वर्षे तरी प्रत्येक मुला-मुलीला मार्शल आर्टचे शिक्षण बंधनकारक केले पाहिजे. एखादा दिवस असा येईल जेव्हा भारतात मार्शल आर्ट क्रिकेटच्या खेळापेक्षा जास्त लोकप्रिय होईल, आणि मी अशा दिवसाची वाट पाहत असल्याचे अक्षय कुमारने सांगितले. चीन आणि सिंगापूर यांसारख्या देशांत मार्शल आर्टचे प्रशिक्षण घेणे हा तेथील संस्कृतीचा अविभाज्या भाग असल्याचे अक्षय कुमारने सांगितले. खास चाकुच्या सहायाने खेळण्यात येणारा ‘टोलपार’ हा रशियन मारामारीचा प्रकार असून, टोलपारच्या प्रशिक्षणासाठी मुंबईत आयोजित केलेल्या एकदिवसीय प्रशिक्षण शिबिराला अक्षय कुमारने हजेरी लावली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा