सध्या अक्षय कुमार त्याच्या फ्लॉप चित्रपटांमुळे चर्चेत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये त्याचे हिंदी चित्रपट बॉक्स ऑफिसवर दाखल झाले. मात्र अक्षयच्या या चित्रपटांकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली. हाती अपयश असतानाही अक्षय सध्या त्याच्या आगामी चित्रपटांच्या तयारीला लागला आहे. पण यादरम्यान तो एका वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आला आहे. आपल्या कुटुंबासह अक्षय लंडनला रवाना झाला आहे. यावेळी त्याने केलेलं वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे.

आणखी वाचा – शाहरुख खानला बॉयकॉट ट्रेंडची भीती, हिंदी चित्रपट सुपरफ्लॉप ठरल्यानंतर घेतला मोठा निर्णय

Girl stops talking to family at boyfriend behest Nagpur news
प्रेमासाठी वाट्टेल ते ! प्रियकराच्या सांगण्यावरुन मुलीचा कुटुंबियांशी अबोला
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Anju Bhavnani
दीपिका-रणवीरची लेक झाली तीन महिन्यांची; आजी अंजू भवनानी यांनी नातीसाठी केली ‘ही’ गोष्ट, पाहा फोटो
Man who left home after wife death returns home after 15 years
पत्नी विरहातून घर सोडले, १५ वर्षानंतर कुटुंबात परतला; नागपुरातील मेयो रुग्णालयात…
Bhoot Bangla Release Date
भीती आणि हास्याचा दुहेरी डोस घेऊन येतोय अक्षय कुमार; ‘या’ तारखेला ‘भूत बंगला’ चित्रपट होणार प्रदर्शित
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
katrina kaif vicky kaushal third marriage anniversary
लग्नाला तीन वर्षे पूर्ण! कतरिना कैफने पती विकी कौशलसाठी केली खास पोस्ट; म्हणाली, “दिल तू…”
article for husband and wife to maintaining healthy relationships
समुपदेशन : तुमचं ‘रॉटन रिलेशनशिप’ नाही ना?

९ सप्टेंबरला अक्षयचा ५५वा वाढदिवस आहे, लंडनमध्ये तो पत्नी ट्विंकल खन्ना आणि मुलांसह वाढदिवसाचं सेलिब्रेशन करणार आहे. पिंकविलाच्या वृत्तानुसार अक्षय जवळपास एक महिना लंडनमध्येच राहणार आहे. तसेच आपल्या कुटुंबाला अधिकाधिक वेळ देणार आहे. पण त्याचबरोबरीने पत्नी ट्विंकल खन्ना लंडनमध्येच राहणार असल्याचं देखील यावेळी अक्षयने स्पष्ट केलं. यामागचं कारण देखील तितकंच खास आहे.

ट्विंकल अभिनेत्रीबरोबरच लेखिका म्हणून देखील प्रसिद्ध आहे. आता फिक्शन रायटिंगमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी लंडनमधील एका विद्यापठामध्ये तिने प्रवेश घेतला आहे. तिथे पुढील शिक्षण ती पूर्ण करणार आहे. त्यामुळे अक्षय जरी भारतात पुन्हा परतणार असला तरी ट्विंकल मात्र आपल्या शिक्षणासाठी लंडनमध्येच राहणार आहे.

आणखी वाचा – “ताज हॉटेलमध्ये पहिल्यांदा गेले अन्…” एका चहाची किंमत पाहून हेमांगी कवीच्या भुवया उंचावल्या

याबाबतच अक्षय म्हणाला, “आई-वडील आपल्या मुलांना शिक्षणासाठी परदेशातील विद्यापिठामध्ये सोडण्यासाठी जातात. आणि इथे मी माझ्या पत्नीला शिक्षणासाठी परदेशात सोडण्यासाठी जात आहे.” अगदी हसत अक्षयने हे वक्तव्य केलं. एकूणच काय तर अक्षय काही काळ आपल्या पत्नी-मुलांसह परदेशात राहणार आहे. आणि नंतर तो भारतात येऊन आपल्या चित्रपटांच्या कामाला सुरुवात करेल.

Story img Loader