रुपेरी पडद्यावरचे सध्याचे सर्वच चित्रपट करोडोंचा गल्ला जमण्याच्या आघाडीत असताना अक्षय कुमारचा ‘बॉस’ मात्र, या आघाडीत मागे राहिला आहे. सलमान, आमिर, शाहरुख, रणबीर यांचे चित्रपट तिकीटबारीवर चांगलीच कामगिरी करत आहेत. पण, बॉलीवूडचा खिलाडी अक्षय कुमार हा अयशस्वी ठरला आहे.
अक्षय कुमारचा ‘बॉस’ बुधवारी ईददिवशी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने प्रदर्शनाच्या सुरुवातीच्या दिवशी केवळ ११.५० कोटींचा निव्वळ नफा कमविला आहे. चित्रपट सुट्टीच्या दिवशी प्रदर्शित झाल्यामुळे निदान त्याने १५ कोटी तरी कमविले पाहिजे होते, असे समीक्षकांचे म्हणणे आहे. त्यामुळे अक्षय कुमार त्याची बॉसगिरी प्रेक्षकांवर चालविण्यास अयशस्वी ठरला आहे. असेच काहीसे रणबीरच्या ‘बेशरम’ चित्रपटासोबतही झाले होते. २ ऑक्टोबरला गांधीजयंतीची सुट्टी साधून प्रदर्शित झालेला ‘बेशरम’ पहिल्या दिवशी तिकीटबारीवर चालला. पण, शुक्रवार येईपर्यंत या चित्रपटाच्या गल्ल्यावर चांगलाच परिणाम झालेला दिसला.
अक्षयची ‘बॉस’गिरी फ्लॉप
रुपेरी पडद्यावरचे सध्याचे सर्वच चित्रपट करोडोंचा गल्ला जमण्याच्या आघाडीत असताना अक्षय कुमारचा 'बॉस' मात्र, या आघाडीत मागे राहिला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 18-10-2013 at 01:03 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Akshay kumars boss fails miserably collects a mere rs 11 cr on opening day