हलकिशी दाढी, खिन्न हावभाव आणि डोक्यावर पगडी अशा स्वरुपात ‘सिंग ईज ब्लिंग’ याचित्रपटात अक्षय कुमार त्याच्या ‘सिंग’ लुक मध्ये परतताना दिसणार आहे. प्रभूदेवाने अलीकडेच ट्विटरवर या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित केला आहे.
ब्रिटीश अभिनेत्री अॅमी जॅक्सन या चित्रपटात आपल्याला दिसणार आहे. आधी किर्ती सनोनची या चित्रपटासाठी निवड करण्यात आली होती. परंतू तारखांचे गणित बसवण्यात अडथळे आल्याने तीची निवड रद्द करण्यात आली. अॅमीचा लुक देखणा जरी असला तरी तीला चित्रपटामध्ये कशाप्रकारचा आणि किती महत्वाचा रोल देण्यात आला आहे हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
‘सिंग ईज ब्लिंग’ २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘सिंग इज किंग’ या चित्रपटाचा सिक्वल आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आपल्याला लाल पगडी परिधान करताना दिसू शकतो. परंतू त्याच्या दु:खी आणि खिन्न हावभावामागचे काय गुपित आहे हे पाहणे महत्वाचे ठरेल.
लारा दत्ता देखील या सिनेमामध्ये आपल्याला दिसणार आहे. येत्या २ ऑक्टोबर रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा