तुझ्यात जीव रंगला’ मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेल्या राणादा आणि पाठकबाई म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर यांची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. छोट्या पडद्यावर लोकप्रिय ठरलेल्या या जोडीने अक्षय्य तृतीयादिवशी साखरपुडा करत सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. याचे अनेक फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. ते पाहिल्यानंतर अनेक चाहत्यांना सुखद धक्का बसला. नुकतंच अक्षयाने तिच्या आणि हार्दिकच्या साखरपुड्याचा एक खास व्हिडीओ शेअर केला आहे.
हार्दिकसोबत साखरपुडा झाल्यानंतर अक्षया देवधर ही इन्स्टाग्रामवर फार जास्त सक्रीय झाल्याचे पाहायला मिळत आहे. तिने हार्दिक आणि तिचे अनेक फोटो आणि व्हिडीओ शेअर केले आहेत. यानंतर आता नुकतंच तिने त्यांच्या साखरपुडा सभारंभाचा एक संपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओत त्यांचा साखरपुडा कसा थाटामाटात पार पडला हे पाहायला मिळत आहे.
राणादा आणि पाठकबाईंच्या साखरपुड्यावर एक्स बॉयफ्रेंडची पहिली प्रतिक्रिया, अक्षया देवधर म्हणाली…
अक्षयाने या व्हिडीओला फार सुंदर कॅप्शन दिले आहे. “आम्हा दोघांचा साखरपुडा झाल्यापासून तुम्हा सर्वांकडून आम्हाला भरभरुन प्रेम आणि आशीर्वाद मिळत आहे. आम्हाला मिळत असलेल्या सर्व प्रेमाबद्दल आम्ही फार कृतज्ञ आहोत. तुम्ही दिलेले हे प्रेम आम्ही शब्दात मांडू शकत नाही.”
“आमचे मेल्स, मेसेजेस, व्हॉट्सअॅप हे शुभेच्छा आणि आशीर्वादाच्या कमेंटने भरुन गेले आहे. त्यामुळे प्रत्येकाला उत्तर देणे शक्य नाही. पण आमच्यावर इतके भरभरुन प्रेम केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. अक्षया आणि हार्दिक म्हणजेच तुमचे राणा आणि अंजली तुमचे फार फार आभारी आहेत. आमचे तुमच्या सर्वांवर खूप प्रेम आहे.” असे अक्षया देवधर म्हणाली.
Video : हातात हात घालून एंट्री ते कपल डान्स, ‘असा’ पार पडला राणादा आणि अंजलीबाईंचा साखरपुडा
दरम्यान अक्षया आणि हार्दिकने त्यांच्या साखरपुड्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. साखरपुड्याचे फोटो शेअर करताना अक्षयानं त्याला ‘अहा ऽऽऽ’ असे कॅप्शन दिले होते. यात तिने दोघांच्याही नावाची आद्याक्षरं एकत्र करत हॅशटॅग म्हणून वापरला होतो. याशिवाय राणादा म्हणजेच अभिनेता हार्दिक जोशीने देखील साखरपुड्याचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. त्याने हे फोटो शेअर करताना त्याला, ‘अखेर साखपुडा पार पडला… #अहा ऽऽऽ’ असं कॅप्शन दिलं आहे.