काही चित्रपट इतके धम्माल असतात की, त्याचे चित्रीकरण करताना त्यामधील कलाकारदेखील त्याची पुरेपूर मज्जा लुटत असतात आणि त्यामुळेच चित्रपटालादेखील एक वेगळा मिडास टच मिळतो. असच काही झालं आहे अक्षय टंकसाळे आणि निखिल वैरागर या दोन कलाकारांच्या बाबतीत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

१६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गॅटमॅट’ चित्रपटात प्रमुख भूमिका असलेल्या अक्षय टंकसाळे आणि निखील वैरागरने अशीच धम्माल मस्ती सेटवर केली आहे. पुण्यात सिम्बोयसिस ओपन इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीच्या आवारात या चित्रपटाचे चित्रीकरण झालं असून या महाविद्यालयाच्या आवारामध्ये दोन्ही कलाकारांनी मनमुराद मस्ती केल्याचं समोर आलं आहे.

अक्षय आणि निखीलने संपूर्ण युनिव्हर्सिटी पिंजून काढली होती. कारण इथे आम्ही शॉट रेडी करत असताना ही दोघं सेटवरून गायब व्हायचे. कॉलेजच्या मुलांसोबत कधी हॉलिबॉल तर कधी फुटबॉल खेळायचे, एकदा तर चक्क चालू लॅक्चरमध्ये ही दोघजण जाऊन बसले होते, त्यामुळे आम्हाला त्यांच्या शोधण घेण्यासाठी अखंड युनिव्हर्सिटी पालथी घालावी लागली होती, दिग्दर्शक निशीथ श्रीवास्तव यांनी सांगितलं.

कॉलेज विश्वावर आधारित असलेल्या या चित्रपटामध्ये अक्षय आणि निखील महाविद्यालयीन तरुणांच्या भूमिकेत दिसत असून, यात ते तरुण-तरुणींचे ‘गॅटमॅट’ जुळवून देण्याचं काम करत आहेत. त्यांसोबत रसिका सुनील आणि पूर्णिमा डे यांचीदेखील यात प्रमुख भूमिका आहे.