बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा ‘बेल बॉटम’ चा ट्रेलर अखेर रिलीज झालाय. सिनेमाच्या संपूर्ण टीमने ३ जुलैला दिल्लीतून ट्रेलर रिलीज केलाय. १९ ऑगस्ट २०२१ रोजी बेल बॉटम हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
या सिनेमाच्या दमदार ट्रेलरमुळे आता प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. एका सत्य घटनेवर आधारित हा सिनेमा असून भारतीय विमानाच्या अपहरणाचा थरार या सिनेमात पाहायला मिळणार आहे. भारतीय विमानाचं अपहरण झाल्यानंतर प्रवाशांच्या सुखरुप सुटकेसाठी सरकारकडून एका खास व्यक्तीकडे सोपवण्यात आलेलं ऑपरेशन आणि ही खास व्यक्ती म्हणजेच अक्षय कुमार साकारत असलेली बेल बॉटम या भूमिकेची झलक ट्रेलरमध्ये पाहायला मिळतेय.
Bringing back the magic of the big screen with #BellBottom.#BellBottomTrailer out now – https://t.co/SdWisNFdFr @vashubhagnani @Vaaniofficial @humasqureshi @LaraDutta @ranjit_tiwari @jackkybhagnani @honeybhagnani @poojafilms
— Akshay Kumar (@akshaykumar) August 3, 2021
या सिनेमात पुन्हा एकदा अक्षय कुमारची अॅक्शन पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमार म्हणजेच ‘बेल बॉटम’ आपल्या टीमच्या मदतीने कशा प्रकारे हे ऑपरेशन हाताळतो आणि प्रवाशांची सुटका करतो याचा शरार सिनेमात पाहायला मिळेत.
हे देखील वाचा: राज कुंद्राच्या अटकेनंतर मुलगा वियानने शेअर केली पहिली पोस्ट
या चित्रपटात अक्षयसोबत अभिनेत्री हुमा कुरेशी, वानी कपूर, लारा दत्ता या अभिनेत्री स्क्रीन शेअर करणार आहेत. बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार या वर्षात एकापेक्षा एक हिट चित्रपट देण्यास तयार आहे. येत्या काळात ‘सूर्यवंशी’, ‘पृथ्वी राज’, ‘बच्चन पांडे’, ‘अतरंगी रे’ ‘धूम 4’ हे त्याचे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.