ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह हे त्यांच्या बेधडक स्वभावासाठी आणि लाजवाब अदाकारीसाठी लोकप्रिय आहेत. चित्रपट, ओटीटी, नाटक अशा तीनही माध्यमांत नसीरुद्दिन यांनी उल्लेखनीय काम केलं. नसीरुद्दीन शाह यांना अभिनयाचं चालतं बोलतं विद्यापीठ म्हणूनही ओळखलं जातं. बऱ्याच कलाकारांना नसीरुद्दीन यांच्या कामातून प्रेरणा मिळाली आहे. अगदी हॉलिवूडच्या एका प्रसिद्ध अभिनेत्यानेसुद्धा नसीरुद्दीन शाह यांच्या अभिनयाची प्रचंड प्रशंसा केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘गॉडफादर’, ‘हिट’, ‘स्कारफेस’सारखे क्लासिक चित्रपट देणारे अभिनेता अल पचीनो यांना कोण ओळखत नाही? आपल्या लाजवाब अभिनयाच्या बळावर त्यांनी या क्षेत्रात आज एवढं मोठं नाव कामावलं. हॉलिवूडमध्ये एकाहून एक असे सरस चित्रपट देणाऱ्या अल पचीनो यांना एका चित्रपटासाठी बॉलिवूड अभिनेते नसीरुद्दीन शाह यांच्या भूमिकेची मदत घ्यावी लागली होती.

आणखी वाचा : “फक्त वादग्रस्त चित्रपट व बोल्ड भूमिकांसाठी…” ‘सेक्रेड गेम्स’फेम राजश्री देशपांडेने व्यक्त केली खंत

१९९२ मधील ‘सेंट ऑफ अ वुमन’ या चित्रपटात अल पचीनो यांनी एका आंधळ्या पण तितक्याच करारी आणि स्वाभिमानी व्यक्तीची भूमिका निभावली होती. ‘फिल्मफेअर’च्या रीपोर्टनुसार एका मुलाखतीमध्ये खुद्द अल पचीनो यांनी हे स्पष्ट केलं की या भूमिकेसाठी त्यांना १९८० मध्ये आलेला नसीरुद्दीन शाह आणि शबाना आजमी यांच्या ‘स्पर्श’ चित्रपटाची बरीच मदत झाली.

सई परांजपे दिग्दर्शित ‘स्पर्श’ हा चित्रपट अल पचीनो यांनी खूप वेळा बघितला, त्यातील नसीरुद्दीन यांच्या अभिनयाचा चांगलाच अभ्यास केला अन् मगच त्यांनी ‘सेंट ऑफ अ वुमन’च्या चित्रीकरणास होकार दिला. योगायोगाची गोष्ट म्हणजे ‘स्पर्श’साठी नसीरुद्दीन शाह यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता आणि अल पचीनो यांना ‘सेंट ऑफ वुमन’साठी त्यावर्षीचा ऑस्कर पुरस्कारही मिळाला होता. नसीरुद्दीन शाह हे नुकतेच ‘ताज: डिव्हाइड बाय ब्लड’ या वेब सीरिजमध्ये झळकले. ते यात मुघल सम्राट अकबराची भूमिका साकारत आहेत. या वेब सीरिजवरूनही बराच गदारोळ झाला होता, पण लोकांना ही सीरिज आवडली आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Al pacino took inspiration from naseeruddin shah to play blind person role in scent of a women avn