हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदाने ९ फेब्रुवारी रोजी सांताक्रुझ येथे झालेल्या कार्यक्रमात ‘ना हिरे नु सता’ या म्युझिक अल्बमचे लाँचिंग केले. या अल्बमच्या अनावरण सोहळ्याला मुंबईच्या दक्षिण विभागाचे अतिरिक्त सहायक आयुक्त कृष्णन प्रकाश यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते. गोविंदाच्या ‘ना हिरे नु सता’ या अल्बमची अनेकांनी स्तुती केली असून याबद्दल त्याने या अल्बमचे दिग्दर्शक रूपेश राय सिकंद, निर्माते अजय मक्कर आणि शोभिता राणा यांचे आभार मानले आहेत. या अल्बमचे चित्रीकरण मालवणमधील नयनरम्य ठिकाणांवर करण्यात आले आहे. आमच्या संपूर्ण टीमने बरीच मेहनत घेतल्यामुळे हा अल्बम अधिक चांगला होण्यास मदत झाल्याचे दिग्दर्शक रूपेश राय सिकंद यांनी लाँचिंग सोहळ्यामध्ये सांगितले.
गोविंदाच्या ‘ना हिरे नु सता’ या म्युझिक अल्बमचे लाँचिंग
हिंदी चित्रपट अभिनेता गोविंदाने ९ फेब्रुवारी रोजी सांताक्रुझ येथे झालेल्या कार्यक्रमात 'ना हिरे नु सता' या म्युझिक अल्बमचे लाँचिंग केले.
First published on: 13-02-2014 at 12:56 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Album na heere nu sata