लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्माचा ‘द कपिल शर्मा शो’ छोट्या पडद्यावर पुन्हा परतला आहे. या शोमधील भारती सिंग, कृष्णा अभिषेक यांसारख्या काही जुन्या कलाकारांनी विविध कारणं देत शोला रामराम ठोकला. तर, यापूर्वीही अली असगर, सुनिल ग्रोव्हर यांनी कपिलची साथ सोडली. कधीकाळी या शोचा भाग राहिलेले कलाकार त्यांचे अनुभव अनेकदा सांगत असतात. कपिलच्या दादीचं पात्र साकारणाऱ्या अली असगरने शो सोडल्यानंतर सध्या तो ‘झलक दिखला जा’ च्या १० व्या सीझनमध्ये स्पर्धक म्हणून दिसतोय, यामध्ये अलीच्या मुलांनी एक महत्वाचा खुलासा केलाय.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रसिद्ध अभिनेत्याशी घटस्फोटानंतर लिव्ह-इनमध्ये राहतेय मराठमोळी रेशम टिपणीस; दुसऱ्या लग्नाबद्दल म्हणाली…

या शोमध्ये अलीच्या मुलांचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला, ज्यामध्ये मुलांनी आपल्या वडिलांमुळे आपल्याला शाळेत येणाऱ्या अनुभवाबद्दल सांगितलं. त्याने सांगितलं की आमचे वडील कपिल शर्मा शोचा एक भाग असल्यामुळे शाळेत आम्हाला टोमणे ऐकायला मिळायचे. व्हिडिओमध्ये अदा तिच्या वडिलांच्या कामामुळे शाळेत होणाऱ्या ट्रोलिंगबद्दल बोलली. ती म्हणाली, ‘आमच्या शाळेतील मित्र आम्हाला चिडवायचे. ते म्हणायचे, तुला दोन आई आहेत. ते आम्हाला दादीचा (अलीच्या पात्राचे नाव) मुलगा, दादीची मुलगी, बसंती वगैरे म्हणत, आमच्या हातावर टॅटू काढत. पण आम्हाला त्या ट्रोलिंगचा फरक पडत नव्हता. कारण इतरांना हसवण्यासाठी स्वतःची चेष्टा करणं प्रत्येकालाच जमत नाही. आम्हाला आमच्या वडिलांचा अभिमान आहे. बाबा आम्ही तुझ्यावर खूप प्रेम करतो’. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर अली भावुक झाला आणि रडायला लागला. तर, परीक्षक म्हणून बसलेल्या माधुरी दिक्षीत यांच्याही डोळ्यात अश्रू होते.

अली सध्या झलक दिखला जामध्ये स्पर्धक म्हणून सहभागी झालाय आणि डान्स करत आहे. या शोमध्ये मराठी अभिनेता गश्मीर महाजनी, मराठमोळी अमृता खानविलकर, अभिनेत्री निया शर्मा, रुबीना दिलैक यांच्यासह अनेक स्टार्स सहभागी झाले आहेत. या शोचे परीक्षक माधुरी दिक्षीत, करण जोहर आणि नोरा फतेही आहेत.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ali asgar kids shares trolling experience in school at jhalak dikhla ja over he being woman in the kapil sharma show hrc