अभिनेता अली फझलने त्याच्या कलागुणांमध्ये आणखी एका कौशल्याची भर टाकली आहे. यावेळी त्याने चक्क नाना पाटेकर यांच्याकडून त्यासाठी धडे घेतले.
अली आता स्केचिंग करायला शिकलायं. यासाठी त्याला दुसरं तिसरं कोणी नाही तर नाना पाटेकर यांनीच धडे दिले. चित्रीकरणादरम्यान रिकामी वेळात नानांना आजूबाजूच्या गोष्टींचे किंवा लोकांचे स्केच काढण्याची सवय आहे. एक चांगला स्केचर कसे व्हावे यासाठी त्यांनी अलीला काही टीप्स दिल्या.
याविषयी बोलताना अली म्हणाला की, नाना हे चित्रपटसृष्टीतील आइनस्टाइन आहेत. ते खूप मोठे कलाकार आहेत. आम्ही स्केचिंगचं एक मस्त सेशन केलं. मी त्यांच्याकडून स्केचिंगच्या टीप्सही घेतल्या. नानांकडून खूप काही शिकण्यासारखे आहे. यादरम्यान मी त्यांना बराचं त्रास दिला असे मला वाटते.
प्रकाश राज यांच्या तडका चित्रपटात नाना पाटेकर, अली फझल, श्रिया सरण, तापसी पन्नू यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा