बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक करण जोहर सध्या त्याचा टॉक शो ‘कॉफी विथ करण ७’मुळे बराच चर्चेत आहे. करण जोहरच्या या शोमध्ये बरेच सेलिब्रेटी हजेरी लावताना दिसतात आणि या शोमध्ये सेलिब्रेटींच्या खासगी आयुष्यातले अनेक खुलासेही याच शोमध्ये होताना दिसतात. नुकतंच या शोमध्ये अभिनेता विकी कौशल आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांनी हजेरी लावली. यावेळी करण जोहरने त्याचा आणि आलिया भट्टचा एक धम्माल किस्सा सांगितला.

विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी ९ डिसेंबर २०२१ रोजी लग्न केलं. या दोघांचा विवाहसोहळा अतिशय खासगी स्वरूपात पार पडला. अगदी बॉलिवूडमधल्याही फार कमी लोकांना याची माहिती देण्यात आली होती. आता करण जोहरच्या शोमध्ये विकी- कतरिनाच्या लग्नाबाबत बरेच मजेदार खुलासे झाले आहेत. काही दिवसांपूर्वी करण जोहर आणि आलियाने दारुच्या नशेत विकी कौशलला कॉल केल्याचं एका मीडिया रिपोर्टमध्ये म्हटलं गेलं होतं. याचा किस्सा आता करणने सांगितला आहे.
आणखी वाचा- ईडीच्या कारवाईनंतर जॅकलिन फर्नांडिसची पहिली पोस्ट, म्हणाली “सर्व काही…”

‘कॉफी विथ करण’ शोमध्ये करण जोहरने याचा स्वतःच खुलासा केला. तो म्हणाला, “मी आणि आलिया त्या रात्री वाईन प्यायला बसलो होतो. आम्ही नशेत होतो आणि बोलता बोलता आम्ही ठरवलं की विकी कौशलला कॉल करायचा. आम्ही जेव्हा विकीला कॉल केव्हा त्याच्या लग्नाच्या विधी सुरू होत्या. आम्ही दोघंही विकी आणि कतरिनाच्या लग्नाबाबत ऐकून खूप भावुक झालो होतो. या दोघांसाठी आम्ही आनंदी होतो आणि त्यासाठी आम्ही त्यांना कॉल केला होता.”

आणखी वाचा-विकी कौशलने कतरिनासह सप्तपदी घेण्यासाठी केली होती घाई, लग्नाबाबत केला रंजक खुलासा

दरम्यान विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनी २०१९ साली एकमेकांना डेट करायला सुरुवात केली होती. लग्न करेपर्यंत त्यांनी त्यांच्या रिलेशनशिपबाबत कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया दिली नव्हती. बॉलिवूडच्या पार्ट्यांना एकत्र हजेरी लावताना दिसल्याने मात्र त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सोशल मीडियावर होऊ लागल्या होत्या

Story img Loader