Alia Bhatt and Ranbir Kapoor Welcomes a Baby Girl : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आई-बाबा झाले आहेत. आलियाने आज (६ नोव्हेंबर) गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. त्यामुळे कपूर कुटुंबात आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. रणबीर कपूरची बहिण रिद्धीमा कपूर हिने याबद्दलची माहिती दिली आहे.

आलिया भट्ट आणि रणबीर कपूर हे आज सकाळी ७.३० वाजता गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात पोहोचले होते. ते पहिल्या बाळाच्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल झाल्याची माहितीही समोर येत होती. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर काही तासातच तिला प्रसूती कळा सुरु झाल्या. यानंतर दुपारी १२ ते १२.३० च्या दरम्यान तिने एका गोंडस बाळाला जन्म दिला. आलिया आणि रणबीरला कन्यारत्न प्राप्त झाले आहे. त्यामुळे त्यांच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
आणखी वाचा : आलिया भट्टच्या चेहऱ्यावर दिसला प्रेग्नन्सी ग्लो, डोहाळे जेवणाचे फोटो समोर

आलिया भट्ट रुग्णालयात दाखल झाल्याचे कळताच तिची आई सोनी राजदान आणि सासू नीत कपूर या दोघीही रुग्णालयात उपस्थित होत्या. त्याबरोबर कपूर आणि भट्ट कुटुंबातील इतर सदस्यांनीही रुग्णालयात धाव घेतली होती.

बाळाला जन्म दिल्यानंतर आलियाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात तिने बाळाच्या जन्माची गुडन्यूज दिली आहे. आणि आमच्या आयुष्यातील सर्वोत्तम बातमी आमच्या बाळाचा जन्म झाला आणि ती एक मुलगी आहे. ती आमचं प्रेम आहे. आम्हाला तुम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की आम्ही पालक झालो आहोत. खूप खूप प्रेम -आलिया-रणबीर, अशी पोस्ट तिने शेअर केली आहे. त्याबरोबर तिने सिंहाच्या कळपाचा फोटोही शेअर केला आहे.

आणखी वाचा : Ranbir Kapoor-Alia Bhatt Wedding : चार पंडित, मोजकेच पाहुणे; रणबीर कपूर आणि आलिया भट्टचा विवाहसोहळा थाटामाटात संपन्न

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचे लग्न १४ एप्रिल २०२२ रोजी मुंबईत झाले होते. लग्नानंतर दोन महिन्यांनी म्हणजे जून महिन्याच्या अखेरीस त्यांनी चाहत्यांना ही गुडन्यूज दिली होती. ते दोघेही सातत्याने चर्चेत होते. कपूर कुटुंबात येणाऱ्या बाळाचे स्वागत करण्यासाठी सर्वजण सज्ज झाले होते.तिच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मोठ्या थाटामाटात पार पडला होता. त्यांचे अनेक फोटोही व्हायरल झाले होते.

यानंतर आलिया भट्ट ही २० ते ३० नोव्हेंबर या दिवसांमध्ये बाळाला जन्म देऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात होती. मात्र त्यापूर्वीच तिने बाळाला जन्म दिला आहे. गिरगावातील ‘एच.एन.रिलायन्स’ रुग्णालयात आलियाने तिच्या बाळाला जन्म दिला आहे. या रुग्णालयात तिचं नाव नोंदविण्यात आलं होतं.

Story img Loader