बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट प्रेग्नन्सीमध्येही जोमाने काम करताना दिसत आहे. सध्या ती आगामी चित्रपट ‘डार्लिंग्स’ चित्रपटाचं प्रमोशन करताना दिसत आहे. महिलांच्या सामाजिक स्थितीवर आधारित असलेला आलियाचा हा चित्रपट येत्या ५ ऑगस्टला ‘नेटफ्लिक्स’ या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने महिलांच्या अंतर्वस्त्रांबाबत एक बोल्ड विधान केलं आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

आलिया सध्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आलियाने सोशल मीडियावर होणारी टीका आणि महिलांवर अश्लील शब्दात केल्या जाणाऱ्या कमेंट यावर भाष्य केलं. महिलांना कशाप्रकारे समाजात वावरताना वेगवेगळे सल्ले दिले जातात किंवा रोजच्या जीवनात त्यांना कशाप्रकारे वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागतं यावरही ती या मुलाखतीमध्ये बोलली.

आलिया म्हणाली, “महिलांना नेहमीच त्यांची ब्रा लवपवण्यास साांगितलं जातं त्याचा मला खूप राग येतो. मी ब्रा कशासाठी लपवावी, तो देखील एक कपडाच आहे. पुरुषांना कधीच त्यांची अंतर्वस्त्र लपवण्यास सांगितलं जात नाही. मला अनेकदा अश्लील कमेंट्सचा सामना करावा लागला आहे. त्यावेळी या गोष्टींकडे फारसा लक्ष दिला नाही. पण आता मी या सर्व गोष्टींवर विचार करू लागले आहे. या मुद्द्याबाबत मी जागरूक असते. मी या विषयांवर बोलते तेव्हा अनेकदा माझ्या मित्रमैत्रिणी मला बोलतात तू एवढी सेंसिटिव्ह का होतेस, तुझी मासिक पाळी सुरू आहेत का? तेव्हा मी त्यांना सांगते मी सेंसिटिव्ह नाही किंवा इतरांपेक्षा वेगळी नाही आणि तुम्ही जेव्हा मासिक पाळीबद्दल बोलता तेव्हा लक्षात घ्यायला हवं की स्त्रियांना मासिक पाळी येते त्यामुळेच माणसाचा जन्मही होतो.”

आणखी वाचा- Exclusive : बॉलिवूड कलाकारांवर राज्याकडून दबाव आणला जातोय का? आलिया म्हणाली…

दरम्यान आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर ती तिचा ‘डार्लिंग’ चित्रपट येत्या ५ ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि शेफाली शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय रणबीर कपूरसोबत तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आगामी काळात ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt bold statement on women hide their bra know what she said mrj