आलिया भट्ट सध्या तिच्या ‘डार्लिंग्स’ या सिनेमामुळे चांगलीच चर्चेत आहे. संस्पेंस, थ्रीलर असलेल्या या सिनेमाचा ट्रेलर उत्सुकता ताणणारा आहे. मात्र सध्या सोशल मीडियावर या सिनेमावर बहिष्कार टाकण्याची मागणी केली जातेय. सिनेमा रिलीज होण्यापूर्वीच #BoycottAliaBhatt हा ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होवू लागला आहे. यावेळी महिलांवरील अत्याचार नव्हे तर पुरुषांवर होणारा हिंसाचार सिनेमाच्या प्रोमोमध्ये दाखवण्यात आल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त करत सिनेमाच्या बंदीची मागणी केली आहे.

आलिया भट्टाचा निर्माती म्हणून ‘डार्लिंग्स’ हा पहिला सिनेमा आहे. मात्र तिच्या या पहिल्याच प्रयत्नात तिने अनेकांचा रोष ओढावून घेतला आहे. डार्क कॉमेडीच्या नावाखाली सिनेमात पुरुषांवरील अत्याचार दाखवण्यात आलाय अशी तक्रार सोशल मीडियावर होत आहे. “आलियाने सिनेमात केवळ अभिनयच केला नाही तर तो प्रोड्यूसही केला आहे. तिने अशा सिनेमाची निर्मिती केलीय ज्यात मनोरंजनाच्या नावाखाली पुरुषांचा छळ दाखवण्यात आलाय.” असं एका नेटकऱ्याने ट्वीट केलं आहे.

हे देखील वाचा: निक जोनसने प्रियांकाला दिले हटके टोपणनाव, फोटो शेअर करत म्हणाला…

तर दुसऱ्या युजरने लिहिलं, “पुरुषांवरील हिंसाचार ही काही साधारण गोष्ट नाही. या गोष्टीवर विनोद कसा केला जाऊ शकतो. भारतात ३.४ करोड पुरुषांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतो आणि हे असह्य आहे.”

हे देखील वाचा: ‘मासूम सवाल’ चित्रपटाच्या पोस्टरवर सॅनिटरी पॅडसोबत भगवान श्रीकृष्णाचा फोटो, दिग्दर्शकावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप

या सिनेमाच्या टीझरमध्ये आलिया तिच्या पतीला पॅनने मारताना दिसतेय. तर कधी तोंडावर पाणी मारताना दिसतेय. सतत पतीचा अपमान करताना दिसतेय. यावरून सोशल मीडियावर संताप व्यक्त केला जातोय. एक नेटकरी म्हणाला, “नेपो किड असणं पुरेसं नव्हत की काय तर आलियाने पुरुषांवरील हिंसाचार दाखवत त्यांची खिल्ली उडवणारा सिनेमा बनवला. “

‘डार्लिंग्स’ सिनेमा के.रीन यांनी दिग्दर्शित केलाय. तर शाहरुख खानच्या रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि आलिया भट्टच्या सनशाइन प्रोडक्शनने या सिनेमाची निर्मिती केली आहे. ५ ऑगस्टला सिनेमा नेटफ्लिक्सवर रिलीज करण्यात आला आहे.

Story img Loader