कलाविश्व म्हटले की ब्रेकअप-पॅचअपच्या चर्चा या कायमच रंगत असतात. या चर्चांमधील सध्याच सर्वात हॉट कपल म्हणजे बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट आणि रणबीर कपूर. सध्या आलिया ‘कलंक’ चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिचा या दरम्यानचा एक व्हिडिओ सोशम मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहत्यांनी हा व्हिडिओ अक्षरश: उचलून धरला आहे.

या व्हिडिओमध्ये आलिया भट्ट, वरुण धवन, सोनाक्षी सिन्हा आणि आदित्य रॉय कपूर यांची मुलाखत सुरू असल्याचे पाहायला मिळाले आहे. या मुलाखतीत वरुण आलियाचे केस ओढून तिला त्रास देत असतो. त्याच्या त्रासाला कंटाळून आलियाने त्याला थांबवण्यासाठी आवाज दिला. पण आवाज देताना वरुण ऐवजी ‘रण…’ असे ती म्हणाली. खरंतर आलियाच्या तोंडातून रणबीर हे नाव निघणार असल्याचे सर्वांनाच कळाले. त्यामुळे सर्वांनाच हसू आले. त्यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

https://twitter.com/reigningbhatt/status/1117015370102136832

गोड निरागस हास्याने साऱ्यांना भुरळ पाडणारी आणि तितक्याच ताकदीने भूमिकेला न्याय देणाऱ्या आलियाने ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटानंतर तिने ‘गली बॉय’, ‘राजी’, ‘२ स्टेट्स’ यासारखे सुपरहिट चित्रपट दिले आहेत. या चित्रपटांच्या यशानंतर आलियाकडे अनेक चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या आहेत. सध्या आलिया बॉलिवूडमधील एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. ‘कलंक’ चित्रपटानंतर लवकरच आलिया ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटात  दिसणार आहेत. त्यानंतर आलिया राजामौली यांच्या ‘RRR’ चित्रपटात देखील काम करणार आहे.