बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री आलिया भट्ट आई बनली आहे. आलियाने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. आलियाला मुलगा होणार की मुलगी याकडे सर्वांचे लक्ष लागले असतानाच, कपूर घराण्यात छोट्या कुमारीचे आगमन झाले आहे. त्यामुळे कपूर आणि भट्ट या दोन्ही कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून आलिया आणि रणबीर या दिवसाची आतुरतेने वाट पाहत होते. त्यांच्यासोबत त्यांचे चाहतेही या दिवसाची वाट पाहत होते. आलियाने मुलीला जन्म दिल्याची बातमी समजताच सोशल मीडियावर अनेक जणांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यातच अनेकांना आलियाची डिलिव्हरी नॉर्मल पद्धतीने झाली की सिझेरियन पद्धतीने हे जाणून घेण्याची उत्सुकता आहे.

६ नोव्हेंबरला आलिया आणि रणबीर मुंबईतील प्रसिद्ध हॉस्पिटल रिलायन्समध्ये पोहोचले होते. त्यानंतर आलिया लवकरच बाळाला जन्म देईल अशी चर्चा रंगली होती. मात्र काही तासांच्या आतच आलियाने मुलीला जन्म दिला. मिळालेल्या माहितीनुसार आलियाची सी सेक्शन पद्धतीने डिलिव्हरी झाल्याचं बोललं जातंय. फोटोग्राफर विरल भयाणी याने सोशल मिडियावर शेअर केलेल्या एका पोस्टनुसार, आलियाची सिझेरियन पद्धतीने डिलिव्हरी झाल्याचं सांगण्यात येतंय. मात्र याबाबत नेमकी माहिती अजूनपर्यंत मिळालेली नाही आहे.

article about upsc exam preparation guidance
यूपीएससीची तयारी : CSAT ची तयारी
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Trials underway to launch Amrut Bharat Express from Pune on four routes in North India Pune print news
पुण्यातून ‘अमृत भारत एक्स्प्रेस’ उत्तर भारतातील चार मार्गांवर सुरू करण्याबाबत चाचपणी सुरू
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
TCS , quarterly results , Infosys, Wipro,
ससा कासवाची गोष्ट : ‘टीसीएस’ला फळले… इन्फोसिस, विप्रोच्या तिमाही निकालांचे काय ?
MPSC announced that it will now conduct screening exams for 33 posts of various types
मोठी बातमी: ‘एमपीएससी’कडून तब्बल ३३ पदांच्या चाळणी परीक्षेसाठी…
Cold Play online ticket sales black market mumbai High Court PIL
कोल्ड प्ले ऑनलाईन तिकीट विक्री काळाबाजार प्रकरण : मार्गदर्शक तत्त्वे आखण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली
Ajit Pawar and Suresh Dhas
Ajit Pawar : सुरेश धस यांनी उल्लेख केलेली मुन्नी कोण? विचारताच अजित पवार संतापून म्हणाले, “असल्या फाल्तू…”

( हे ही वाचा: आलिया भट्टने मुलीला जन्म देण्यासाठी निवडली ६ तारीख? अंकशास्त्रानुसार कारण आहे खास)

आलियाने तिच्या इंस्टाग्रामवर मुलीच्या जन्माची गुडन्यूज शेअर केली असून चाहत्यांनी त्या पोस्टवर कमेंटचा वर्षाव केला आहे. आलिया आणि रणबीरसाठी त्यांचे चाहतेही प्रचंड खूश दिसत आहेत. त्यासोबत अनेक सेलेब्रिटींनी सुद्धा तिच्या या पोस्टवर कमेंट करत शुभेच्छा दिल्या आहेत. मिळालेल्या माहितीनुसार आलियाची आणि मुलीची तब्बेत पूर्णपणे ठीक असून, मुलगी आलिया सारखी दिसते की रणबीर सारखी हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.

Story img Loader