दिग्दर्शक आणि ‘बिग बॉस ८’ची सूत्रसंचालक फराह खान ही ‘फराह की दावत’ या कुकिंग शोचं सूत्रसंचालन करणार आहे. यामध्ये बॉलीवूडची चुलबुली अभिनेत्री आलिया भट्ट येणार असून ‘बिग बॉस ८’चा विजेता गौतम गुलाटी तिच्यासोबत दिसेल. या दोघांनी सदर कार्यक्रमात एकत्र मिळून पाककृती तयार केली. फराहनेही त्यांच्या पाककृतीला थम्स अप देत त्याची वाहवा केली. आलियाने तर ‘फराह की दावत’च्या सेटवरील फोटोही प्रसिद्ध केला होता.
फराहनेही ट्विट केले की, “फराह की दावतचं शूटिंग खूप मजेदार होतं. दोघांचेही आभार.” कलर्स वाहिनीवर २२ फेब्रुवारीपासून हा कार्यक्रम सुरु होणार असून अनेक सेलिब्रिटी फराह सोबत दिसतील. यात सेलिब्रेटी जरा हटके पाककृती करून दाखवणार आहेत.
या कार्यक्रमाचा पहिला पाहुणा अभिषेक बच्चन असणार आहे.
फराह ची दावत!
दिग्दर्शक आणि 'बिग बॉस ८'ची सूत्रसंचालक फराह खान ही 'फराह की दावत' या कुकिंग शोचं सूत्रसंचालन करणार आहे.
First published on: 16-02-2015 at 03:16 IST
मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt dons chefs hat for farah khan