दाक्षिणात्य अभिनेता अल्लू अर्जुन हा लोकप्रिय अभिनेत्यांपैकी एक आहे. अल्लू अर्जुनचे लाखो चाहते आहेत. पुष्पा या चित्रपटामुळे अल्लू अर्जुनच्या लोकप्रियतेत वाढ झाली. या चित्रपटानंतर अल्लू अर्जुनच्या चाहत्यांमध्ये अनेक बॉलिवूड कलाकार देखील आहेत. दरम्यान, आता बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने अल्लू अर्जुनविषयी एक वक्तव्य केलं आहे.
आलियाने अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. आलिया म्हणाली, माझ्या संपूर्ण कुटुंबाने पुष्पा चित्रपट पाहिला आणि अल्लू अर्जुनचे चाहते झाले. ते आता मला बोलतात की आलू तू अल्लूसोबत कधी काम करणार? जर मला अल्लू अर्जुनसोबत काम करण्याची संधी मिळाली तर मला आनंद होईल.
आणखी वाचा : “तुझं मुळ विसरू नकोस”, झोमॅटोच्या जाहिरातीवरून अल्लू अर्जुन झाला ट्रोल
Photo : पेडर रोडवरील प्रभाकुंज निवासस्थानातील ‘या’ घरात राहायच्या लतादीदी
अल्लू अर्जुनचा पुष्पा हा चित्रपट प्रदर्शित होऊन 50 दिवस झाले. तरी जगभरात बॉक्स ऑफिसवर चित्रपट सुपर हीट ठरला आहे. या चित्रपटाच्या हिंदी डबने 100 कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर 2021 मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा हा चित्रपट ठरला आहे.