बॉलिवूडमध्ये सर्वाधिक चर्चेत असलेल्या जोड्यांपैकी एक म्हणून रणबीर कपूर आणि आलिया भट्ट यांच्याकडे पाहिले जाते. गेल्या काही दिवसांपासून ते दोघेही विवाहबंधनात अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र अद्याप त्यांच्या लग्नाची तारीख निश्चित झालेली नाही. आलिया आणि रणबीर अनेकदा त्यांच्या नात्याबद्दल विविध खुलासे करत असतात. तर दुसरीकडे सिनेसृष्टीतील इतर कलाकार त्यांची मस्करी करण्याची एकही संधी सोडत नाही. नुकतंच बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरने आलियाची ताजमहाल पाहण्यावरुन खिल्ली उडवली आहे.

नुकतंच रणबीर कपूर, अर्जुन कपूर यांसह अनेक सेलिब्रेटी लव रंजनच्या विवाहसोहळ्यात सहभागी झाले होते. यासाठी ते सर्वजण आग्रामध्ये गेले होते. नुकतंच अर्जुनने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत आग्र्यातील ताजमहाल पाहायला मिळत आहे. या फोटोला कॅप्शन देताना अर्जुन म्हणाला की, ‘जेव्हा रणबीर कपूर हा ताज आणि मी…यापासून प्रेरित होतो’. त्यानंतर अर्जुन कपूरने आलिया भट्टला चिडवण्यासाठी तिला टॅग केले आहे.

दरम्यान अर्जुन कपूरच्या या पोस्टवर अभिनेत्री रकुल प्रीतने कमेंट केली आहे. “हाहाहा… शेवटी तुम्ही दोघांनी ताज पाहिला.” यावर अर्जुन कपूर उत्तर देत म्हणाला, “रकुलप्रीत हो, त्याने पाहिला. पण आलियासोबत जाण्याऐवजी आधी माझ्यासोबत पाहिला”. यासोबत त्याने स्माईलचे काही इमोजी पोस्ट केले आहेत. अर्जुनच्या या पोस्टवर त्याचे चाहते कमेंट करताना दिसत आहे.

दरम्यान नुकतंच आलियाला रणबीर आणि अर्जुनच्या ताजमहालाच्या फोटोबद्दल विचारले. तसेच तुम्ही कधी ताजमहालला भेट देण्याचा विचार करत आहात का? असाही प्रश्न विचारण्यात आला. त्यावर आलिया म्हणाली, “अर्जुन हा कार्टून आहे. रणबीर काही दिवसांपूर्वी परतला आहे. सध्या तरी ताजमहालला जाण्याचा कोणताही विचार नाही. पण मला तो फोटो खूप आवडला आहे. तो फार छान फोटो आहे.”

Video : ‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ मध्ये अनपेक्षित वळण, मानसीला जवळ करत जयदीप करणार गौरीचा कडेलोट

आलिया आणि रणबीर दोघेही गेल्या काही महिन्यांपासून त्यांच्या आगामी चित्रपटाच्या शूटींग आणि प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. आलिया ही ‘गंगूबाई काठियावाडी’, ‘RRR’, ‘डार्लिंग्स’, ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटात व्यस्त आहे. यातील ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचे शूटींग अद्याप बाकी आहे. तर रणबीर हा सध्या ‘शमशेरा’, ‘ऐनिमल’ या सारख्या चित्रपटात व्यस्त आहे.