आलिया भट्टचा गंगूबाई काठियावाडी हा चित्रपट सोशल मीडियावर बराच चर्चेत आहे. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सुरुवातीपासून आपला दबदबा कायम राखला आहे. पहिल्याच दिवशी या चित्रपटानं तब्बल ८ कोटींचा गल्ला जमवत बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करणार असल्याचं स्पष्ट केलं होतं. आता हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये दाखल झाला आहे. एवढंच नाही तर या चित्रपटानं नवा विक्रम देखील आपल्या नावे केला आहे.

समीक्षक तरण आदर्श यांनी गंगूबाई काठियावाडीच्या कलेक्शनबाबत एक ट्वीट केलं आहे. त्यांनी चित्रपटाच्या कलेक्शनचे आकडे त्यांच्या ट्वीटमध्ये दिले आहे. त्यांनी लिहिलं, ‘गंगूबाई काठियावाडीनं आज बॉक्स ऑफिसवर सेंच्युरी पूर्ण केली. लॉकडाऊन नंतर १०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचणारा हा चौथा चित्रपट ठरला आहे. याआधी सूर्यवंशी, पुष्पा हिंदी आणि ८३ या चित्रपटांनी १०० कोटींचा गल्ला जमवला आहे.’

Switch Mobility bus
स्विच मोबिलिटीकडून ‘लो फ्लोअर’ प्रकारात दोन सिटी बस
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Tourist places in Konkan Special trains on Konkan Railway route Winter tourism Mumbai news
अखेर विशेष रेल्वेगाडीला वीर, वैभववाडी, सावंतवाडीत थांबा, गर्दीच्या हंगामात प्रवाशांना दिलासा
Special trains for Konkan and Goa on year end and long weekend
कोकण, गोव्यासाठी विशेष रेल्वेगाड्या
Important update regarding Raigad Fort Project to build Shiv Srushti at Pachad gains momentum
रायगड किल्ल्या संदर्भात महत्त्वाची अपडेट… पाचाड येथील शिवसृष्टी उभारणीच्या प्रकल्पाला गती
land acquisition for ring road
रिंग रोडसाठी २०० हेक्टर भूसंपादन बाकी; ५०० कोटींच्या निधीची रस्ते विकास महामंडळाकडे मागणी
confusion among passengers after badlapur local departing from thane replaced with csmt local train
ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांचा गोंधळ; अचानक मुंबई दिशेकडे जाणारी लोकल लावल्याने प्रवाशांमध्ये संभ्रम
Central Railway security rescued 1099 children in 11 months with police and employee coordination
‘ऑपरेशन नन्हे फरिश्‍ते’ ; रेल्‍वे सुरक्षा दलाने अकराशे मुलांची केली सुटका

आणखी वाचा- ‘चला हवा येऊ द्या’मध्ये दिसणार अक्षय कुमारचा मराठमोळा अंदाज, या अभिनेत्रीसोबत केला धम्माल डान्स

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची बरीच चर्चा झाली. एवढंच नाही तर समीक्षकांनीही आलिया भट्टच्या अभिनयाचं कौतुक केलं आहे. आलिया भट्टच्या अभिनयातूनच चित्रपटासाठी तिने घेतलेली मेहनत दिसून येत आहे.

आणखी वाचा- प्रसिद्ध अभिनेत्यानं १५ वर्षीय रेखा यांना तब्बल ५ मिनिटं जबरदस्तीने केलं किस, अन्…

आलिया भट्टची मुख्य भूमिका असलेला ‘गंगूबाई काठियावडी’ हा चित्रपट मुंबईतील कमाठीपुराच्या माफिया क्वीन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गंगूबाई यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केलं आहे. अगदी कमी वयात स्वतःच्या नवऱ्यानंच कमाठीपुरा येथील एका कोठ्यावर विकल्यानंतर अनेक संघर्ष करत गंगूबाई तिथल्या माफिया क्वीन कशा झाल्या, याची कथा आता मोठ्या पडद्यावर पाहायला मिळत आहे. या चित्रपटात अजय देवगण करीम लाला ही भूमिका साकारताना दिसत आहे.

Story img Loader