बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या बरीच चर्चेत आहे. काही आठवड्यांपूर्वीच आलियानं तिच्या प्रेग्नन्सीची घोषणा केली. सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आलियानं याची माहिती दिली होती. त्यानंतर आलिया ‘डार्लिंग्स’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चला दिसली. ट्रेलरच्या वेळी आलियानं परिधान केलेल्या ड्रेसची बरीच चर्चा झाली होती. कारण आपला बेबी बंप दिसणार नाही असा ड्रेस तिनं ट्रेलर लॉन्चसाठी निवडला होता. त्यानंतर आता आलियाचा आणखी एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. तिच्या या व्हिडीओचं सोशल मीडियावर बरंच कौतुक होताना दिसत आहे.
आलिया भट्टच्या ‘डार्लिंग्स’ चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी प्रदर्शित झाला. त्यानंतर आलियाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये आलिया ब्लॅक कलरच्या सलवार सूटमध्ये दिसत आहे. ती फोटोसाठी पोझ देतानाच्या या व्हिडीओचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे. या व्हिडीओमधील आलियाच्या एका कृतीने सर्वांची मनं जिंकली आहेत. फोटोसाठी पोझ देताना आलिया ड्रेसमधून दिसणारा बेबी बंप ओढणीने कव्हर करताना दिसत आहे.
आणखी वाचा-‘डार्लिंग्स’ सिनेमाच्या ट्रेलर लॉन्चला आलियाची हजेरी, बेबी बंप लपविण्यासाठी निवडला ‘हा’ खास लूक
आलिया भट्टचा हा व्हिडीओ प्रसिद्ध व्हिडीओ जर्नलिस्ट विरल भयानी यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. आलियाच्या या व्हिडीओवर चाहत्यांनी प्रेम व्यक्त केलं आहे. अनेकजण आलियाचं कौतुक करताना दिसत आहेत. काहींनी तिच्या ड्रेसिंग सेन्सचं कौतुक केलं तर काहींनी तिच्या बेबी बंप ओढणीने कव्हर करण्याच्या कृतीचं कौतुक केलं आहे. एका युजरनं या व्हिडीओवर कमेंट करताना लिहिलं, “ती बेबी बंप लपवण्याचा प्रयत्न करत आहे. हेच आपले भारतीय संस्कार आहेत.”
दरम्यान आलिया भट्टने अभिनेता रणबीर कपूरशी १४ एप्रिल २०२२ ला लग्न केलं होतं. त्यानंतर २७ जूनला तिने प्रेग्नन्सीची गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली होती. आलियाच्या कामाबद्दल बोलायचं तर तिचा ‘डार्लिंग्स’ चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे. याशिवाय ९ सप्टेंबरला रणबीर कपूरसोबतचा तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट प्रदर्शित होणार आहे.