बॉलिवूडची अभिनेत्री अलिया भट सध्या इम्तीयाझ अलीच्या ‘हायवे’च्या चित्रीकरणात व्यस्त असून, हा चित्रपट आपल्यासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचे तिचे म्हणणे आहे.
वीस वर्षीय अलिया, रनदीप हुडा सोबत ‘हायवे’ या चित्रपटातून दिसणार असून, यावर्षी १३ डिसेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
“दिल्ली मध्ये ‘हायवे’चे चित्रीकरण करताना चांगला अनुभव आला. या चित्रपटाचे चित्रिकरण आम्ही संपवत आहोत यावर माझा विश्वास बसत नाही. हा चित्रपट माझ्यासाठी अतिशय महत्वाचा असून, प्रेक्षकांना देखील तो आवडेल.” असे अलियाने आपल्या ट्विटरवर म्हटले आहे.
‘हायवे’चे चित्रीकरण भारतातील वेगवेगळ्या सहा राज्यांमध्ये झाले आहे. दोन भिन्न स्वभावाच्या, मात्र नशिबाने एकत्र आलेल्या सहप्रवासींची ही कथा आहे.  

Story img Loader