बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट ही सध्या डार्लिंग या चित्रपटामुळे चर्चेत आहे. या निमित्ताने आलिया निर्मिती क्षेत्रात पदार्पण करत आहे. सध्या ती या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. त्यात आता आलिया आई होणार आहे. सिनेसृष्टीसह खासगी आयुष्यामुळे ती सातत्याने चर्चेत असते. अनेक चित्रपटांमध्ये व्यस्त असलेल्या आलियाने नुकतंच तिच्या कामाबद्दल वक्तव्य केले आहे.

नुकतंच आलियाने ई टाइम्सला मुलाखत दिली. यावेळी आलियाने सिनेसृष्टीतील काम आणि त्यातून होणारी दगदग याबद्दल भाष्य केलं आहे. यावेळी ती म्हणाली, “जर तुम्ही तंदुरुस्त असाल, तुमची तब्ब्येत ठिक असेल तर तुम्हाला विश्रांती घेण्याची गरज भासत नाही. मी काम करत असताना मला समाधान मिळतं. अभिनय ही माझी आवड आहे. यामुळे मी कायम उत्साही असते. त्यामुळे मी १०० वर्षाची होईपर्यंत काम करेन.”

आणखी वाचा – Exclusive : “कलाकार फक्त प्रचंड पैसे घेतात असं नाही तर…” मानधनाबद्दलच्या प्रश्नावर आलिया भट्टचे स्पष्ट उत्तर

यावेळी आलियाने तिच्या चित्रपटसृष्टीतील १० वर्षांच्या प्रवासाबद्दल, तसेच त्यात आलेल्या काही अनुभवांबद्दल भाष्य केले. “अनेकदा मला लोक माझ्या भूतकाळाबद्दल विचारतात. पण मी सांगू इच्छिते की मला मी केलेल्या कोणत्याही गोष्टीचा पश्चात्ताप नाही. मी भूतकाळात बदल करावे असे काहीही नाही. कारण मी आज जी कोणी आहे, ती मी भूतकाळात उचललेल्या योग्य पावलांमुळे आहे”, असे आलियाने सांगितले.

“माझ्याकडे कलाकारांना संधी देण्याची ताकद आहे, यासाठी मी फार कृतज्ञ आहे. मी तरुण दिग्दर्शक आणि लेखकांकडून आलेल्या कल्पनांना चालना देऊ शकते. ही एक विशिष्ट जबाबदारी आहे. आज मी जिथे आहे, तिथे पोहोचण्यासाठी मी खूप मेहनत घेतली आहे. कोणत्याही क्षेत्रात कठोर परिश्रम करावे लागतात. पण मला वाटतं की मी गाळलेला घाम, अश्रू, रक्त आणि अनेक रात्री झोप न घेणं यामुळे हे सर्व शक्य झाले आहे. मी माझे प्रॉडक्शन हाऊस बनवण्याबद्दल आणि नवनवीन विषयांवर चित्रपट निर्मिती करण्याबद्दल फार उत्सुक आहे”, असे आलिया भट्ट म्हणाली.

आणखी वाचा – “मी ब्रा कशाला लपवू…” आलिया भट्टचं बोल्ड वक्तव्य चर्चेत

दरम्यान आलिया भट्टच्या कामाबद्दल बोलायचं तर ती तिचा ‘डार्लिंग’ चित्रपट येत्या ५ ऑगस्टला नेटफ्लिक्स या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होतोय. या चित्रपटात आलियासोबत विजय वर्मा, रोशन मॅथ्यू आणि शेफाली शाह यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. याशिवाय रणबीर कपूरसोबत तिचा ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तसेच आगामी काळात ती रणवीर सिंगसोबत ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ तसेच हॉलिवूड चित्रपट ‘हार्ट ऑफ स्टोन’मध्ये दिसणार आहे.

Story img Loader