आलिया भट्ट आणि रणबीर कपूरचा ‘ब्रह्मास्त्र’ हा बहुचर्चित चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची अनेक प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटासाठी जवळपास ३०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. या चित्रपटाचे तीन भाग असणार आहेत. जबरदस्त स्टार कास्ट आणि मोठ्या खर्चासोबतच मोठी मेहनत या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने घेतली आहे. सध्या या चित्रपटाचे प्रमोशन जोरदार पद्धतीने सुरु आहे. या चित्रपटात अभिनेता नागार्जुनही जबरदस्त भूमिकेत पाहायला मिळणार आहे. नुकतंच नागार्जुनने आलिया-रणबीरसह त्यांच्या होणाऱ्या बाळाला खास आशीर्वाद दिले आहेत.

‘ब्रह्मास्त्र’या चित्रपटाचे सध्या जोरदार प्रमोशन केले जात आहे. नुकतंच हैदराबादमधील रामोजी फिल्मसिटीमध्ये या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त एका कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. मात्र गणेशोत्सवामुळे तो रद्द करण्यात आला. यानंतर हैदराबादमधील एक वेगळ्या ठिकाणी या चित्रपटाचे प्रमोशन पार पडले. यावेळी एसएस राजामौली, करण जोहर, मौनी रॉय, रणबीर कपूर, आलिया भट्ट, नागार्जुन अक्किनेनी, ज्युनियर एनटीआर यांसारख्या अनेक दिग्गज व्यक्तींनी हजेरी लावली.

आणखी वाचा : ‘तिने माझी फसवणूक केली’, मिथुन चक्रवर्ती आणि माधुरी दीक्षितचे संबंध बिघडण्याचं कारण आलं समोर 

यावेळी नागार्जुन यांनी या चित्रपटाच्या शूटींगचा त्यांचा अनुभव सांगितला. तसेच रणबीर कपूर आणि आलिया भट्ट या दोघांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. यावेळी नागार्जुनने रणबीर आणि आलियाला आशीर्वादही दिले. यावेळी ते म्हणाला, “आम्हाला असे वाटते की तुम्हाला एक गोंडस बाळ व्हावे, अशी आमची इच्छा आहे. तो तुमच्या दोघांसारखाच खूप मोठा होऊ दे. असे मी तुम्हा दोघांना आशीर्वाद देतो.” नागार्जुनने हे आशीर्वाद दिल्यानंतर आलिया आणि रणबीरने हसत हसत त्यावर प्रतिक्रिया दिली. याचा एक व्हिडीओही समोर आला आहे.

आणखी वाचा : “ती मूर्ख…” आलियाच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर चित्रपटगृहाचा मालक संतापला

दरम्यान अयान मुखर्जी दिग्दर्शित या चित्रपटाचा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. अनेकांनी ‘ब्रम्हास्त्र’च्या ट्रेलरचं तोंडभरुन कौतुक केलं आहे. या चित्रपटाची कथा पौराणिक कथांवर आधारित आहे. प्रेम, रोमान्स, थ्रिलर आणि सस्पेन्स सारंच या चित्रपटात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आलिया भट्ट आणि रणबीर कपूर यांच्यासह बिग बी अमिताभ बच्चन, साऊथ सुपरस्टार नागार्जुन आणि प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री मौनी रॉय यांच्या देखील या चित्रपटात मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपट येत्या ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे.

Story img Loader