बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या ‘ब्रह्मास्त्र’ या तिच्या आगामी चित्रपटामुळे चर्चेत आहे. या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा आहे. येत्या ९ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होत आहे पण त्याआधी चित्रपटाच्या विरोधात हॅशटॅग बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंड सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय. मागच्या काही काळापासून सुरू असलेल्या या बॉयकॉट ट्रेंडचा फटका आतापर्यंत बऱ्याच चित्रपटांना बसला आहे. आता ‘ब्रह्मास्त्र’च्या विरोधातही हा ट्रेंड चालवला जात आहे. आता यावर आलिया भट्टने प्रतिक्रिया दिली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ब्रह्मास्त्र’ चित्रपट ९ सप्टेंबरला चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. यात रणबीर आणि आलियाशिवाय अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मौनी रॉय यांच्याही भूमिका आहेत. यात शाहरुख खान आणि दीपिका पदुकोण यांची नावे पाहुण्या कलाकारांच्या भूमिकेसाठी चर्चेत आहेत. प्रदर्शनाच्या आधी या चित्रपटावर बहिष्कार टाकला जात आहे. जेव्हा आलिया भट्टला दिल्लीतील पत्रकार परिषदेत सध्याच्या या वातावरणाबद्दल प्रश्न विचारण्यात आला तेव्हा तिने यावर समर्पक उत्तर दिलं.
आणखी वाचा- अनन्याशी ब्रेकअपच्या चर्चांवर इशान खट्टरने सोडलं मौन, म्हणाला “आशा करतो की आयुष्यभर…”

आलिया भट्ट म्हणाली, “कोणतं वातावरण? उन्हाळा? हिवाळा? असं काहीही नाही. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी हे खूप सुंदर वातावरण आहे. सध्या आपल्याला निरोगी आणि सुरक्षित राहण्याची गरज आहे. आपण सर्वांनी जीवनाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. असे काही बोलू नका, पसरवू नका. काहीही नकारात्मक वातावरण नाही, सर्व काही सकारात्मक आहे, सर्वकाही चांगले आहे.”

आणखी वाचा- “करणमुळे संधी तिच्या पायाशी…” जेव्हा ऐश्वर्याने आलियाला लगावला होता टोला

यानंतर आलिया भट्ट म्हणाली, “बऱ्याच काळानंतर चित्रपटगृहात परतत असल्याने आम्हाला खूप आनंद झाला आहे. चित्रपट पुन्हा एकदा चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहेत. आम्हाला आमचे काम करायला मिळत आहे आणि ते प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे याचा खूप आनंद आहे. वातावरण हेच आहे की नुकताच सप्टेंबर सुरू झाला, पुढचा महिना ऑक्टोबर सुरू होईल.”

‘ब्रह्मास्त्र’बद्दल बोलायचे झाले तर हा चित्रपट पाच भाषांमध्ये 3D स्क्रीनवर प्रदर्शित होणार आहे. इंग्रजी, हिंदी व्यतिरिक्त तमिळ, मल्याळम आणि कन्नड भाषेत हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. डिस्ने आणि धर्मा प्रॉडक्शनने या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर दिग्दर्शन अयान मुखर्जीने केलं आहे. या चित्रपटाचं बजेट ४१० कोटी रुपये असल्याचं बोललं जात आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt react on boycott brahmastra trend says there is nothing negative mrj