आपण गरोदर असल्याचं अभिनेत्री आलिया भट्टने इन्स्टाग्राम अकाऊंटद्वारे फोटो शेअर करत सांगितलं. तिथपासून आलियाबाबत बी-टाउनमध्ये विविध चर्चा रंगू लागल्या. ‘हार्ट ऑफ स्टोन’ या हॉलिवूड चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलिया काही दिवसांसाठी परदेशात होती. आता या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण करत ती भारतात परतली आहे. आलियाचा मुंबई विमानतळावरील व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
आणखी वाचा – “माझ्या पतीसह आम्ही सगळेच नशेमध्ये होतो अन्…”; राधिका आपटेनेच सांगितलं स्वतःच्या लग्नात नेमकं काय घडलं?
आलिया बऱ्याच दिवसांनी भारतात आली आहे. गरोदरपणामधील तिचा लूक पाहण्यासाठी सगळेच उत्सुक होते. आलिया मुंबई विमानतळावर पोहोचताच तिला पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. पण यादरम्यान आलियाला एक वेगळंच सरप्राईज मिळालं. आलियाला नेमकं काय सरप्राईज मिळालं हे व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये दिसत आहे.
पाहा व्हिडीओ
आलियला मुंबई विमानतळावर पापाराझी छायाचित्रकारांनी घेरलं. यावेळी आलियाला अनेकजण शुभेच्छा देत होते. यादरम्यान आलिया आपल्या गाडीच्या दिशेने जात होती. पापाराझी छायाचित्रकारांनी आलियाला रणबीर तुला घ्यायला आला असल्याचं सांगितलं. हे ऐकताच गाडीच्या दिशेने ती लगबगीने जाताना दिसली. रणबीरला पाहताच आलियाचा आनंद गगनात मावेनासा झाला होता.
आणखी वाचा – Photos : परी म्हणू की सुंदरा…; प्राजक्ता माळीच्या नव्या लूकवर खिळल्या साऱ्यांच्या नजरा
खूप दिवसांनी नवऱ्याला भेटताच बेबी म्हणून आलियाने त्याला मोठ्या आवाजात हाक मारली. इतकंच नव्हे तर रणबीरला घट्ट मिठी देखील मारली. आलिया-रणबीरचा हा व्हिडीओ पाहून दोघांचं नातं किती घट्ट आहे हे स्पष्टपणे दिसून आलं. शिवाय दोघं एकमेकांना खूप मिस करत असल्याचं देखील यावेळी समजलं. रणबीर आपल्यासाठी येणार आहे याची आलियाला कल्पना नव्हती. पण रणबीरचं हे सरप्राईज पाहून आलियाला अगदी आनंद झाला.