‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट प्रदर्शित झाला अन् आलिया भट्टने पुन्हा एकदा आपण उत्तम अभिनेत्री असल्याचं सिद्ध केलं. चित्रपटांच्या भूमिकेसाठी आलिया करत असलेली मेहनत मोठ्या पडद्यावर दिसून येते. तिचे चित्रपट पाहत असताना तुम्ही देखील हे अनुभवलं असेल. ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपट तर तिच्या करिअरमधील महत्त्वाचा चित्रपट ठरला आहे. चित्रपटाच्या यशाचं सुख अनुभवत असताना रणबीर कपूरशी लग्न करत तिने नव्या आयुष्याला सुरुवात केली. सध्या ती ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाच्या चित्रीकरणामध्ये व्यस्त आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याच चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यानचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. या व्हिडीओमध्ये ती दिल्ली विमानतळावर सामना घेऊन पळताना दिसत आहे. तिचा हा व्हायरल झालेला व्हिडीओ पाहून काही वेळासाठी चाहते मात्र बुचकळ्यात पडले होते. दिल्ली विमानतळावर या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या सुरु आहे.

दिल्ली विमानतळावर आलियाला पाहण्यासाठी चाहत्यांनी बरीच गर्दी केली होती. विमानतळावर सुरु असलेल्या चित्रीकरणादरम्यान दिग्दर्शक करण जौहर देखील उपस्थित होता. करणने यावेळी काळ्या रंगाचा ट्रॅकसुट परिधान केला होता. तसेच कोणत्या दिशेने पळायचे याबाबत तो आलियाला सांगत असल्याचं या व्हिडीओमध्ये दिसत आहे.

आणखी वाचा – प्रतिक्षा संपली! लवकरच ‘मिर्झापूर’चा तिसरा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला येणार

करणने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंद्वारे काही दिवसांपूर्वी या चित्रपटाची घोषणा केली होती. १० फेब्रुवारी २०२३मध्ये हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखल होईल. या चित्रपटामध्ये आलियासह अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकणार आहे. ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’मुळे रुपेरी पडद्यावर आलिया-रणवीर पुन्हा एकदा एकत्र पाहण्यांची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे.

मराठीतील सर्व मनोरंजन बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Alia bhatt runs with luggage at delhi airport for rocky aur rani ki prem kahani movie shooting kmd